शाळेतले पहिले पाऊल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर मराठी
ममदापुर : येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संदीप म्हसे, उपाध्यक्ष श्री रवींद्र हजारे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सना परवेज पटेल ( ग्रामपंचायत सदस्य ममदापूर ) उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर चे सर्व शिक्षक वृंद व सर्व अंगणवाडी सेविका यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासांतर्गत विविध प्रकारच्या स्टॉलची मांडणी करून विद्यार्थ्यांकडून विविध खेळ व कृतीचे प्रात्यक्षिक करून घेतले याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळाचे मुख्याध्यापक श्री जावेद सर ,श्री ज्ञानेश्वर जेजुरकर, पालक प्रतिनिधी श्री संजय काळे ,श्री राजू शेख श्री योगेश कडसकर, श्री सोमनाथ भालेराव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर मराठी व उर्दू चे सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका श्रीम .वैशाली सोनवणे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली
0 टिप्पण्या