प्रगतीशील शेतकरी मा.सरपंच शिवाजीराव चव्हाण यांचे दु:खद निधन
( पारनेर प्रतिनीधी ) : जुन्नर तालुक्यातील पूर्व भागामधे शेतकर्यांच्या जीवनामधे विकासाची गंगा आणणारे जेष्ठ व्यक्तीमत्व,जुन्नर तालुक्यातील मोठ्या शेतकर्यांमधे एक असलेले प्रगतीशील शेतकरी तसेच पारगांव ( मंगरुळ ) गांवचे माजी सरपंच शिवाजीराव नानाजी चव्हाण यांचे दि.४ एप्रिल रोजी सकाळी १० : १० वाजता वयाच्या ८४ व्या वर्षी दु:खद असे निधन झाले. शोकाकुल वातावरणा मधे त्यांच्या पारगांव गावामधे त्यांच्यावर सायंकाळी ५:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रामधे शिवाजीराव चव्हाण यांचे नांव फार मोठे राहीले असुन,समाजामधे नाना या नावाने त्यांची ओळख होती.त्यांनी पारगांव गांवचे सरपंच म्हणुन केलेले काम फार मोठे आहे.त्यांनी जुन्नर तालुक्यातील पूर्व भागामधे हुंडेकरी सोबत फर्टीलायझर व्यवसाय केला. पूर्व भागातील सर्वात मोठी हुंडेकरी असलेले ते शेतकरी असुन सर्व शेतकर्यांना त्यांची शेती व्यवसाया मधे फार मोठी मदत झाली आहे.
त्यांच्या पक्षात त्यांचे मोठे चिरंजीव सभाजी,धाकटे चिरंजीव राजाराम व बहीण जनाबाई झावरे अशी तीन अपत्ये,सुना,नातवंडे,पतवंडे असा परीवार आहे.त्यांच्या जाण्यामुळे त्यांचे चव्हाण कुटुंबिय,नातेवाईक यांना दु:ख झाले आहे.राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसेपाटील यांचे ते विश्वासु सहकारी होते.त्यांच्या निधनानंतर पारगांव सह तालुक्याच्या पूर्व भागामधे हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या