आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग माळीचिंचोरे फाटा येथून एकास अटक
नेवासा - नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे फाटा येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग लावणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून बेटिंगच्या साहित्यासह १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
क्रिकेटचे सामन्यानावर बेटिंग माध्यमातून लाखो रुपयाचा सट्टा लावला जात असतो त्यानुसार सध्या सुरू असलेल्या आयपीएल चे टी २० क्रिकेट सामन्यावर बॅटिंग लावले जात आहे का याकडे पोलीस लक्ष ठेवून आहेत. याच दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की माळीचिंचोरे फाटा तालुका नेवासा येथे साजिद पठाण हा उघड्यावर बसून त्याच्या मोबाईल फोनवर ऑनलाइन साइटवर आयपीएल क्रिकेट मॅच वर बेकायदा पैसे लावून सट्टा खेळत व खेळवित आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून
त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0 टिप्पण्या