पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण..



पारनेर  : छत्रपती संभाजी नगर येथे ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक मराठवाडा साथीचा पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शुक्रवारी दि .७ एप्रिल रोजी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आणि पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, संयोजक मुख्य संपादक चंदुलाल बियाणी,जगदीश बियाणी यांच्या उपस्थितीत झाले.

पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी यांचे जीवन व पत्रकारिता आदर्श असुन मराठवाड्याच्या विकासात त्यांचे योगदान अनमोल आहे.त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार  अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने पत्रकार प्रबोधिनी सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ, यासाठी बीड  जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देऊ,असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी  दिले.तर पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे बैठक लावुन पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.तर पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा दिला तर शासनावर प्रभाव पडेल, छोटी वृत्तपत्र सामान्य माणसाचा आवाज आहेत त्यासाठी ती अर्थीक पातळीवर सक्षम झाली पाहिजेत यासाठी  उत्पादन खर्चावर आधारित विक्री किंमत असे धोरण स्विकारावे लागेल. शासनाने ही वृत्तपत्रांना अधिकची मदत करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन वसंत मुंडे यांनी केले.तर पत्रकारांसाठी स्वतंत्र अर्थीक विकास महामंडळ असावे असे मत प्रमोद डोईफोडे यांनी व्यक्त केले. प्रस्तावीक डॉ. प्रभू गोरे तर सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले.



पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक दयानंद माने, मुुंबईतील विशेष प्रतिनिधी चंदन शिरवाळे, संपादक पवन देशपांडे, युनिसेफ महाराष्ट्रचे राज्य सल्लागार तानाजी  पाटील तर ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्काराने तर संस्थापक संपादक शिवरतन मुंदडा व ‘कार्यगौरव’ पुरस्काने छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय

पाटील,महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड आदींना सन्मानित करण्यात आले.



विभागीय पुरस्कार प्राप्त  पत्रकार

मराठवाडा विभाग : बाबा देशमाने (, संपादक, बीड),चंद्रकांत तारू (पैठण तालुका प्रतिनिधी), सचिन बडे ( छत्रपती संभाजीनगर ), प्रा.डॉ. विठ्‌ठल जायभाये ( परभणी), आनंद इंदानी ( बदनापूर तालुका प्रतिनिधी), सचिन कोरडे ( धाराशिव जिल्हा प्रतिनिधी), संग्राम वाघमारे (चालकूर तालुका प्रतिनिधी), गोकुळसिंग राजपूत ( सोयगाव तालुका प्रतिनिधी), शकील खलिफा ( पैठण तालुका प्रतिनिधी), गोकुळ लांडे ( गंगापूर प्रतिनिधी), संदीप मानकर (सिल्लोड तालुका प्रतिनिधी), सुरेश वायभट (पैठण तालुका प्रतिनिधी), प्रा. बिभीषण चाटे, ( बीड), प्रा. बाळासाहेब बोराडे (जालना जिल्हा प्रतिनिधी)

विदर्भ विभाग : प्रमोद पाणबुडे (वर्धा), एकनाथ चौधरी ( प्रतिनिधी),

नाशिक विभाग : किरणकुमार आवारे ( निफाड तालुका प्रतिनिधी), बंडू खडांगळे ( दिंडोरी तालुका प्रतिनिधी), मनोहर बोचरे (देवगाव प्रतिनिधी)

पश्चिम महाराष्ट्र विभाग : श्रीकांत चौरे (पारनेर तालुका प्रतिनिधी), नवनाथ खिल्लारे ( प्रतिनिधी), अशोक सूर्यवंशी (मिरजगाव प्रतिनिधी), नरहरी शहाणे (पाथ्रडी तालुका प्रतिनिधी), अजय नजन ( शेवगाव तालुका प्रतिनिधी), किसन पवार ( कोपरगाव तालुका प्रतिनिधी)



कोकण विभाग : सचिन दामोदर कांबळे (टाईम्स् नाऊ न्यूज चॅनल, रत्नागिरी), विनोद पवार (दै. पुढारी, मंडणगड प्रतिनिधी),  

अमरावती विभाग :  गुलाबराव इंगळे (दै. सकाळ, जळगाव जामोद, तालुका प्रतिनिधी), सागर झनके (दै. आधुनिक केसरी, जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी), अमोल गावंडे (दै. निर्भीड स्वराज संपादक, खामगाव), किरण डोंगरदिवे (मुक्त पत्रकार) आदींना सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या