अवकाळीचे थैमान : गारपिटीने कांदा गहु ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

  पिकांची पाहणी करून त्वरीत पंचनामे करण्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कृषिविभागाला सूचना...

दिपक खोसे l राष्ट्र सह्याद्री 

ढोरजळगांव:-

शेवगांव तालुक्याच्या पश्चिम भागातील ढोरजळगावने भातकुडगांव,भातकुडगांव फाटा भायगांव,बक्तरपुर,देवटाकळी,शहरटाकळी परीसरात शुक्रवारी झालेल्या बेमोसगी अवकळी पाऊसाने व गारपीटी झाल्याने अक्षरक्षा कांदा पिकांला पातच राहिलेली नसुन काढणीला आलेल्या व काढलेल्या गहु व कांदा पिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आसुन आमदार मोनिकाताई राजळे यांनी सकाळी ९ वा गारपीटीने व अतिपाऊसाने नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेतावर जाऊन नुकसान झालेल्या कांदा गहु पिकांची पाहणी केली व पडझड झालेल्या शेतक-याच्या घराची पाहणी करून मंडळ आधिकारी कृषिआधिकारी व महसुल विभागाला त्वरीत पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आसुन पालकमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे लवकरांत लवकर पंचनामे पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल आसे आमदार राजळे यांनी बोलताना सांगितले.     यावेळी बापुसाहेब पाटेकर,गणेश कराड,आनंता ऊर्किडे बाळासाहेब कराड,महादेव पाटेकर,तालुका कृषिआधिकारी अंकुश टकले,नायब तहसिलदार रविंद्र सानप महसुल मंडळ आधिकारी आप्पासाहेब शिंदे,संभाजी फटांगरे,लक्ष्मण फटांगरे,डॉ श्याम काळे,रमेश कळमकर,मधुकर फटांगरे, भामानिक शेकडे,आशोक देशपांडे,ब सुरेश बडे,गणेश सामृत,देव संदीप खरड मुसा शेख हि सरपंच महादेव पवार उपसर सुभाष बडधे, दत्तु वाघमोडे, लक्ष्मण नजन, सचिन तोंगे,आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या