११ एप्रिल रोजी होणार पुरस्कार वितरण..
( पारनेर प्रतिनिधी ) : -माळी महासंघ अहमदनगर शहर व जिल्हा आणि क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.या वर्षीचा
" राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार " अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष तसेच दैनिक अक्षराजचे पत्रकार वसंत रांधवण यांना जाहीर झाला आहे. मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी त्यांना सन्मान पूर्वक हा पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
माळी महासंघ अहमदनगर जिल्ह्याच्या व क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करत असते.या वर्षीचा समाजरत्न हा बहुमोल पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बद्दल तसेच महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून चळवळीत स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटाऊन आपली वेगळी ओळख निर्माण केलेले वसंत भानुदास रांधवण यांना जाहीर झाल्याने या क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.
वसंत रांधवण हे गेली १५ वर्षांपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संघटनेत काम करत आहेत. राजकीय,धार्मिक,सहकार,शैक्षणिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
मंगळवारी ११ एप्रिल २०२३ रोजी नंदनवन लाॅन टिळक रोड अहमदनगर येथे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे किशोर डागवाले, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव, माजी महापौर अनिल बोरूडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, जिल्हा अध्यक्ष दत्ता गाडळकर, डॉ.सतिश राजुरकर, शिवसेना उपशहरप्रमुख संदिप दातरंगे, उद्योजक गणेश नन्नवरे, पुष्पाताई बोरुडे,गौरीताई नन्नवरे, नगरसेविका सुवर्णाताई जाधव, नगरसेविका मंगलताई लोखंडे,परेश लोखंडे, जालिंदर बोरूडे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंगलताई भुजबळ आदी मान्यवरांच्या हस्ते वसंत रांधवण यांना समाजरत्न पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल रांधवण यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या