पारनेरच्या जनतेला दहशतमुक्त करण्यासाठी जनसेवा पॅनेलला साथ द्या-सुजय विखेपाटील.

 


पारनेरला जनसेवा पॅनेलच्या सभेला सभासदांसह मोठी गर्दी..


अधिकार्‍यांचा ३ वर्षाचा माज १ महीन्यात उतरवतो - खा. डॉ. सुजय विखेपाटील



छाया : दत्ता गाडगे

पारनेर बाजार समीती निवडणुक जनसेवा सहकारी पॅनेलच्या प्रचारार्थ मनकर्णिका लाॅन्समधे झालेल्या सभेत बोलताना खासदार सुजय विखेपाटील.


दत्ता गाडगे /राष्ट्र सह्याद्री 

पारनेर :

पारनेर बाजार समीतीची निवडणुक जसजसी अंतिम टप्प्यात येत आहे.तसतसे मोठमोठ्या सभेतील भाषणांमुळे पारनेरमधे वातावरण अधिकच तापु लागले आहे.

पारनेर बाजार समीतीची सत्ता सामान्य मतदारांनी ताब्यात द्या पारनेरमधील जनतेला दहशतमुक्त करण्याची ग्वाही देतो.अधिकार्‍यांचा ३ वर्षाचा माज १ महीन्यात उतरवतो असे प्रतिपादन खासदार सुजय विखेपाटील यांनी केले.

पारनेर बाजारसमिती निवडणुकी साठी भाजपा-सेना पुरस्कृत जनसेवा सहकारी पॅनेलच्या प्रचारार्थ पारनेर मधील मनकर्णिका लाॅन्समधे सभेचे आयोजन केले होते. यावेळी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेपाटील हे बोलत होते.

 याप्रसंगी व्यासपीठावर अहमदनगर जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरेपाटील, शिवसेना नेते व अहमदनगर जि.प.चे मा.सभापती बाबासाहेब तांबे, शिवसेनेचे पारनेर पं.स.चे मा.सभापती गणेश शेळके,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष सुनिल थोरात, महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, राहुलपाटील शिंदे,शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, मनसेचे तालुका प्रमुख बाळासाहेब माळी,सचिनपाटील वराळ, मा.अध्यक्ष वसंत चेडे, शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक पै.युवराज पठारे, नगरसेविका विद्या गंधाडे यांचे चिरंजीव त्र्रुषी गंधाडे, नगरसेविका निता ठुबे यांचे पती देवराम ठुबे,नगरसेवक अशोक चेडे,सिताराम खिलारी, योगेश रोकडे,पंकज कारखिले,राजाराम एरंडे, खंडू भाईक,किरण कोकाटे, किसन धुमाळ,लहू भालेकर, बाळासाहेब पठारे,बापू भापकर, गंगाधर रोहोकले,श्रावण गायकवाड, शशिकांत देशमुख, रामभाऊ मांडगे, संजिव भोर,डाॅ.भाऊसाहेब खिलारी,दिनेश बाबर,सुरेश पठारे, शैलेंद्र औटी,संध्या काळे,सोनाली सालके,सिताबाई गायकवाड, कारभारी आहेर,बापू भापकर, अमोल अमुप,सागर मैड,दत्ता पवार, बाळासाहेब कळमकर, विलास झावरे,कोंडीभाऊ ठाणगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले,या पारनेर तालुक्यातील मतदारांनी मला विक्रमी मतांनी खासदार म्हणुन निवडुन दिले. विशेषत: ज्या शिवसैनिकांनी मला निवडुन दिले ते आजही माझ्या  सोबत आहेत.  " ये तो ट्रेलर है ।, पिक्चर अभी बाकी है। " असे  सांगत,ज्यांच्या विरुध्द विधानसभा लढवली,ज्यांना चोर, दरोडेखोर,गुंड म्हणाले त्यांनाच हे आता साहेब म्हणायला लागले. किती लाचारी करताय..? शोभते का. ६ महीन्यांपूर्वी छुपी युती केली.१५ दिवसाचे राजकारणा मधे यांनी स्वाभीमान गहाण ठेवला.सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. शिवसेना नगरसेवकांना विचारात न घेता राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक आज जनसेवा पॅनेलसोबत व्यासपीठावर हजर आहे.स्वत:चे स्वार्थासाठी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला.

 आम्हाला परकीय,बाह्य आक्रमण म्हणतात.मी या विभागाचा खासदार आहे.मला पारनेरकरांनी विक्रमी मतांनी निवडुन दिले आहे.मला तुमची प्रापर्टी हवी आहे का.? यांच्यासारखे खंडणी, हप्ते हवे आहेत का.? पाहुना येतो आणि जेवुन जातो.मला काहीही नको. समोरच्यांच्या भाषणात शिव्या आणि आरोप आहेत. गेल्या ३ वर्षात जिल्हापरीषदेमधुन सर्व सरपंच,ग्रामपंचायतींना कुठलीही टक्केवारी न घेता फंड दिला. यापुढील काळामधे आपल्याला धनगर व मेंढपाळ समाजाला ५ कोटींचा प्रकल्प उभा करीन द्यायचा आहे. लोकरची एक्स्पोर्ट फॅसीलीटी देवुन त्यांना हक्काची बाजारपेठ आपण देणार आहोत.

मागील ५० वर्षाच्या राजकारणामधे अनेकांनी आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांनाच आम्ही कोंडले.आम्हाला कोंडीत पकडणारा अजुन जन्माला यायचाय.

इथे पारनेरचा पीआय लोकप्रतिनीधीं सोबत विमान प्रवास करतो,मुजरा करायला जातो.तो जनतेला सुरक्षित कसे ठेवणार..? प्रतिष्ठाणचा कार्यकर्ता लोकांना गाडीने मागुन उडवुन मर्डर करतो,येथील महीला, अधिकारी,स्रिया सुरक्षित नाहीत.

आपण यांचे वाळुचे धंदे बंद केले,मटका जुगार अवैध धंदे बंद केले.हे धंदे बंद करुण आपण जनहिताचे काम केले असेल तर जनसेवा सहकार पॅनेलच्या कपबशी चिन्हावर मत द्या. अन्यता मत नाही दिले तरी चालेल.आता तुम्ही द्याल तो निर्णय मला मान्य राहील.परंतु आपण विचारपूर्वक निर्णय घेवुन परीवर्तनाची ताकद काय असते ते दाखवुन द्यावी.तालुक्याच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या.मला काहीही नको येथील गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आपण हि लढाई लढतोय.माझा स्वार्थ असेल तर मला जरुर पाडा परंतु,तुमचे अश्रु पुसणारे परत उरणार नाही.आमच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोष मतांनी निवडुण द्या.मी तालुक्यातील जनतेला दहशतमुक्त करण्याची ग्वाही देतो.विश्वास प्रेमभावना ठेवा,स्वाभीमान जागृत ठेवावा असे विखे म्हणाले.

यावेळी बोलताना सुजित झावरेपाटील म्हणाले,आजची २५ तारखेची मतदारांची गर्दी हि परीवर्तनाची ठरेल.खासदार विखेंना परकीय ताकद म्हणता, त्यांचा व्हिजा पाकीस्तानचा आहे का..?पूर्वि राजकारणात मतभेद होते पण मनभेद नव्हते.आमच्या शैक्षणिक संस्थेत लोकप्रतिनिधींच्या बायको संचालक असाव्यात अशी धारणा लोकप्रतिनिधींची.यांनी काही उमेदवार असे घेतलेत ते नेहमी संचालक का होतात दोघांनाच मार्केट कमीटी का लागते.एकाने जमीन विकली आणि दूसर्‍याने ति घेतली.बाजार समीतीवर दरोडा टाकायचा.एकाला माझे वडील दादांनी लाल दिवा दिला ते आता बाजार समीतीला उभे आहेत.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जे २०० मतांनी भाळवणी सोसायटी मधे पराभूत झाले त्यांना यांनी उमेदवारी दिली.पैशाने या तालुक्यात कुणी कुणाला विकत घ्यायला जन्माला यायचाय. विखेपाटलांचे माध्यमातुन तालुक्यात ५० कोटीचे रस्ते,अनेक गोरगरीबांना वयोश्रीचा लाभ दिला.सध्या छोटे बाॅम्ब फुटलेत पुढे मोठे बाॅम्ब फुटायचे आहेत.

राज्यामधे पणन मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील आहेत.खासदार सुजय विखेंनी शब्द दिलाय बाजार समीती ताब्यात घ्या पाहीजे तेवढा निधी बाजार समीतीला देवु.

विश्वनाथ कोरडे म्हणाले,विखेंना बाह्य आक्रमण म्हणताय.

नगरपंचायतला तालुक्याच्या लोकप्रतिनीधींना बाह्य आक्रमण म्हणाले,आता खासदार सुजय विखें बाह्य आक्रमण झाले.आपली बाजार समीती २ कोटीवरुण २०० ते ४०० कोटींवर नेण्याची क्षमता फक्त खासदार सुजय विखेंमधे असल्याचे कोरडेंनी सांगीतले.

राहुलपाटील शिंदे म्हणाले,निष्ठावंतांचा बळी देवुन विरोधकांनी आघाडी केली.लाखात मतदान घेणार्‍या लोकप्रतिनीधीला आघाडी करावी लागली.राज्यातच आघाडी टिकणार नाही तर,यांची आघाडी कशी टिकेल.? 

तर,आमच्या पॅनेलच्या उमेदवारांना कुणी ओळखत नाही म्हणताय.सर्व सोसायटीचे  मतदार संघाचे ११ उमेदवार हे त्यात्या गांवच्या सोसायटीचे चेअरमन आहेत. ग्रामपंचायतचे उमेदवार सर्व त्यात्या गावचे सरपंच आहेत.तर,एकजण मा.पंचायत समीती सदस्य आहे.जमलेल्या सभासदांच्या गर्दीवरुन आपला विजय निश्चित असल्याचे शैलेंद्र औटी म्हणाले. यावेळी सभासदांसह प्रचंड मोठा जनसमुदाय जमला होता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या