श्रीरामपूर : ब्राह्मण सेवाभावी प्रतिष्ठान व ब्राह्मण युवा संघ यांच्या वतीने समस्त हिंदू धर्मियांचे आराध्यदैवत, चिरंजीव भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित राजाचा नातू परशुराम हे ब्राम्हण कुळातील भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.त्यांचा जन्म सम्राट प्रसेनजित राजाचा जावई ऋषी जमदग्नी व राजकन्या रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला.
जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. अशी आख्यायिका सांगितली जाते.
तरी या वर्षी सकल ब्राह्मण समाजातर्फे श्रीरामपूर शहरात भव्य शोभायात्रा शनिवार दि. २२एप्रिल रोजी नवीन मराठी शाळेपासून संध्याकाळी ठिक ५:३०वा. मोठ्या संख्येने श्री भगवान परशुरामांच्या पालखीची अतिशय उत्साहात, पारंपारिक वाद्यांच्या गजरात संपन्न होणार आहे.
अशी माहिती श्री परशुराम जयंती उत्सव आयोजन समितीने दिली.
0 टिप्पण्या