रामनवमीनिमित्त भरण्यात आलेला आनंद मेळावा बंद

श्रीरामपूर शहरातील रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित आनंद मेळाव्यावरून वाद झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तरीदेखील पाळणे आणि आनंद मेळावा सुरू होता. मात्र आज पासून प्रशासनाने थेट कारवाई करत आनंद मेळावा बंद केला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी या संदर्भातील माहिती दिली.
श्रीरामपूर येथे रामनवमीनिमित्त शहरातील रासकर नगर म्हाडा कॉलनी पाठीमागे भरण्यात आलेल्या आनंद मेळावा भरविल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय . श्रीरामपूर नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणी फिर्याद दिली होती. शरहातील रासकर नगर म्हाडा कॉलनीच्या पाठिमागे नगरपरिषदेची कोणतीही विनापरवागी न घेता या ठिकाणी आनंद मेळावा भरविण्यात आला. या ठिकाणी मोठमोठे यांत्रीक पाळणे, इतर यांत्रीक खेळणी लावण्यात आली. नुकतीच शिर्डी येथे रामनवमी यात्रे निमीत्ताने लावण्यात आलेल्या राहट पाळणा तुटुन झालेल्या बरेचनागरिक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औषधोउपचार सुरू आहेत. अशा प्रकारची घटना सदर आनंद मेळाव्यात घडु नये, तसेच तेथे जमलेल्या गर्दीमुळे कोणताही अपघात, वित्तहानी, किवा जिवीतहानी घडु नये म्हणुन सदर आनंद मेळावा आज पासुन जनतेसाठी बंद करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलाय . आनंद मेळावा व त्यातील मोठमोठे यांत्रीक पाळणे, इतर यांत्रीक खेळणी आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल्स व हातगाडे जनतेसाठी बंद करण्यात आलेय असे श्रीरामपूर नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या