'मविआ'कडून सातत्याने स्वातंत्र्यवीरांचा अवमान

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा आरोप 
 अहमदनगर : 
 महाविकास आघाडी सरकार कडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला जातोय आणि अशा वेळी त्यांच्या मांडीला मंडी लावून माजी मुख्यमंत्री बसत आहेत याची चीड सर्वत्र निर्माण होत असून जनतेच्या मनात या बद्दल आक्रोश आहे, या यात्रेच्या निमित्ताने त्याला समर्पक उत्तर देत असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यार्‍या सैनिका बद्दलची किती खालच्या पातळीवर विरोधकांची विचारसारणी आहे हे यातून दिसत असल्याचे दक्षिण नगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी संगितले. नगर शहरात भाजपा आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने ते बोलत होते. 


 यावेळी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांचे जेष्ठ नेते हे सातत्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या स्वातंत्र्य सैनिका बद्दल अवमानास्पद वक्तव्य करत आहेत, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे माजी मुख्यमंत्री हे त्यांच्या मांडीला मांडी लावून वज्रमुठ सभा घेत आहेत. त्यामुळं त्यांचं बेगडी हिंदुत्व हे सर्वसामान्यांना कळलं असून भाजप आणि शिवसेना हेच हिंदुत्वाचे कडवे रक्षक आहेत. या गौरव यात्रेतून सावरकर यांच्या त्याग आणि निष्ठेची अनुभूति सर्वांना करून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी या प्रसंगी संगितले. यावेळी चौपाटी कारंजा चौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या गौरव यात्रेत भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे,एड.अभय काका आगरकर,वसंतराव लोढा, सुवेंद्र गांधी,दिलीप सातपुते, अनिल शिंदे, बाबूशेट टायरवाले, माजी महापौर बाबासाहेब वाकले, धनंजय जाधव , सुरेखा विदये, शशांक कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, महेश नामदे, विवेक नाईक , बाबासाहेब गायकवाड आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते. या गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या