श्री सिध्दीविनायक पतसंस्थेचे काम कौतुकास्पद : सौरभजी देशमुख



श्रीरामपुर : शहरातील श्री सिद्धिविनायक पतसंस्थेस सनदी अधिकारी,केंद्रीय गृह मंत्रालयातील अर्थ सल्लागार,अर्थ राज्यमंत्री मा.श्री.भागवतजी कराड यांचे माजी स्विय सहाय्यक मा.श्री.सौरभजी देशमुख यांनी मंगळवार दि.१८ एप्रील २०२३ रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी यावेळी श्री सिद्धिविनायक परिवाराच्या सर्व उपक्रमाबद्दल माहिती घेतली व श्री सिद्धिविनायक पतसंस्था, श्रीरामपूर यांच्या कामाचे कौतुक केले.




  यावेळी अनौपचारीक चर्चा करताना त्यांनी पतसंस्थेत सर्वतोपरी मदत व विवीध उपक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.श्री सिद्धिविनायक पतसंस्था, श्रीरामपूरच्या कामामुळे ग्रामीण भागातील विकासाला नक्कीच मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी श्री सिद्धिविनायक परिवाराचे कुटुंबप्रमुख श्री.वासुदेवजी काळे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब कोकरे, सोमनाथजी लोखंडे, मनजीतसिंग बतरा, अजयजी चौधरी व संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या