Breaking News : श्रीरामपूर पोलिसांकडून सोन्या बेग अखेर जेरबंद




श्रीरामपूर  : अनेक गुन्ह्यांमध्ये श्रीरामपूर पोलिसांना हवा असलेला आणि गेल्या दोन वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार सोन्या बेग यास पोलिसांनी जेर बंद केले आहे.
सोन्या बेग वर नाशिक, अहमदनगर अशा  पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात अनेक गुन्हे दाखल आहेत.
शहरातील आदर्श लॉज च्या मालकांना सोन्या बेग याने काल लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली अखेर सोन्या बेग यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, जिल्हा पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या अधिपत्यखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, जीवन बोरसे, पोलीस शिपाई शफीक शेख, रघुवीर कारखिले, गौतम लगड, रमिज राजा आतार, गणेश गावडे आदींनी सदरची कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या