पारनेर : बाजार समिती निवडणुकीमधे आ.निलेश लंके व मा.आ.विजय औटी यांच्या शेतकरी पॅनेलने सर्व १८ जागांवर विजय मिळवत केला विजयी जल्लोष.. ( छायाचित्र : दत्ता गाडगे) |
पारनेर बाजार समितीवर महाविकास आघाडीचा महाविजय...
गुरुशिष्य मा.आ.औटी,आ.लंके यांच्या शेतकरी पॅनेलचा दणदणीत विजय..
( पारनेर तालुका प्रतिनिधी ) : -
नगर जिल्ह्यामधे महत्वाची समजली जाणार्या पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमधे सर्वांचा अंदाज फोल ठरवत आमदार निलेश लंके व राज्य विधानसभेचे मा.उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनेलने खासदार सुजय विखेपाटील यांच्या जनसेवा पॅनेलचा दारुण पराभव करत सर्व १८ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. खासदार सुजय विखेंपाटील यांच्या जनसेवा पॅनेलचा १८/० असा दारुण पराभव झाला.
पारनेर तालुका बाजार समितीसाठी शुक्रवार दि.२८ एप्रिल रोजी न्यु इंग्लिश स्कुल येथे मतदान प्रक्रिया पार पडली होती.शनिवार दि.२९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय पारनेर येथे मतमोजणी झाली.निवडणुक निर्णय अधिकारी गणेश औटी यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी ५ टेबलवर मतमोजणी करण्यात आली.खासदार सुजय विखे यांच्यामुळे निवडणुकीत रंगत आली होती.तीन पॅनेलमधे लढत होईल असे वाटत असताना अखेर गुरु-शिष्य मा.आ.विजयराव औटी व आ.निलेश लंके यांनी एकत्र येत आघाडीचा धर्म पाळत शेतकरी पॅनेल उभे केले.समोरुन खासदार विखेंनी जनसेवा पॅनेल उभे करुन आव्हाण देण्याचा प्रयत्न केला. मात्र गुरु-शिष्याने मतभेद विसरुन त्यांना धोबीपछाड देत,सर्व १८ जागांवर विजय संपादन करत,बाजार समितीवर आपली निर्विवाद सत्ता आणली.विखेंंच्या जनसेवा पॅनेलला खातेही खोलता आले नाही.राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार निलेश लंके व राज्य विधानसभेचे मा.उपाध्यक्ष विजयराव औटी यांना फोन करत शेतकरी पॅनेलच्या विजयी उमेदवारांचे आभार मानले.
महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनेलचे नेतृत्व आमदार निलेश लंके, राज्य विधानसभेचे मा.उपाध्यक्ष विजयराव औटी,मा.सभापती राहुल झावरेपाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सभाजी रोहोकले यांनी केले.
भाजपा सेनेच्या युतीच्या जनसेवा पॅनेलचे नेतृत्व खासदार सुजय विखेपाटील,अहमदनगर जिल्हा परीषदेचे मा.उपाध्यक्ष सुजितराव झावरेपाटील,जि.प.चे मा.सभापती बाबासाहेब तांबे,भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य विश्वनाथ कोरडे,सभापती गणेश शेळके, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल थोरात,राहुलपाटील शिंदे यांनी केले.
पारनेर बाजार समितीमधे शेतकरी पॅनेलचे विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे :
* सहकारी सोसायटी मतदार संघ :
( सर्वसाधारण )
एकुण मतदान - १३४०,झालेले मतदान - १३२०,वैध मते - १२४५,
अवैध मते - ७५
१)गायकवाड प्रशांत सबाजीराव - ८१४ मते
२) भोसले रामदास हनुमंत - ७६८
३)खोडदे आबासाहेब भाऊसाहेब - ७५७
४)तरटे बाबासाहेब भिमाजी - ७३८
५)सालके संदिप लक्ष्मण - ७३३
६)सावंत अशोकराव साहेबराव - ६९४
७)सुपेकर किसन पंढरीनाथ - ६७९
* सहकारी सोसायटी महीला राखीव :
एकुण मतदान - १३४०,झालेले मतदान - १३२०,वैध मते - १३१२,
अवैध मते - ०८
८)पठारे पद्मजा श्रीकांत - ९२३
९)रोकडे मेघा श्रीरंग -७८४
* सहकारी सोसायटी इतर मागास वर्ग :
एकुण मतदान - १३४०,झालेले मतदान - १३२०,वैध मते - १३११,
अवैध मते - ०९
१०)बेलकर गंगाराम तुकाराम - ८२९
* विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग :
एकुण मतदान - १३४०,झालेले मतदान - १३२०,वैध मते - १३०८,
अवैध मते - १२
११)नर्हे बाबासाहेब वामनराव - ७८९
* ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण :
एकुण मतदान - १०५२,झालेले मतदान - १०३९,वैध मते - १००१,
अवैध मते - ३८
१२)रासकर किसनराव सबाजी - ६०५
१३)पवार विजय विनायक - ५९६
* ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती/जमाती :
एकुण मतदान - १०५२,झालेले मतदान - १०३९,वैध मते - १००२,
अवैध मते - ३७
१)शंकर ताराचंद नगरे -५९२
* ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक :
एकुण मतदान - १०५२,झालेले मतदान - १०३९,वैध मते - १००९,
अवैध मते - ३०
१)भाऊसाहेब सखाराम शिर्के - ५०६
*व्यापारी/आडते मतदार संघ :
एकुण मतदान - ५७६,झालेले मतदान - ५६४,वैध मते - ५६३,
अवैध मते - १
१)अशोकलाल माधवलाल कटारीया - ३३८
२)चंदन रमेश भळगट - ३८९
*हमाल/मापाडी मतदार संघ :
एकुण मतदान - १६२,झालेले मतदान - १५४,वैध मते - १५१,
अवैध मते - ३
१)तुकाराम दत्तु चव्हाण - ६५
________
आमचा तालुक्यातील मतदारांवर विश्वास होता.तो मतदारांनी सार्थ ठरविला आणि शेतकरी पॅनेलला भरघोष मतांनी विजयी केले.यापुढे तालुक्यात जे काय करायचे हे आपण ठरवु बाहेरच्यांनी उपदेश करु नये. जिल्हापरीषद निवडणुकी मधेही अशीच एकी ठेवा.तुमच्या विश्वासाला तडा जावु देणार नाही.हा आमच्या महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे.यापुढे औटीसाहेबां कडे गण द्यायची,ते वार करणार, माझ्याकडे ढाल आहे आणि राहुलभैय्या झावरेंकडे भाला आहे.लंके झावरे एकत्र येतील असे कुणाला नव्हते, मात्र हे शक्य झाले..कारण हे आमचे पहीले प्रेम होतं.जिथे विखेंची यंत्रणा संपते तिथुन आपली यंत्रणा सुरु होते.माझ्या मतदारांनी अशक्य ते शक्य करुन दाखविले आणि परकीय आक्रमण परतवुन लावले. मतदारांच्या विश्वासाला कधीही तडा जावु देणार नाही अशीच कामगीरी आमचे संचालक मंडळ करेल असा विश्वास देतो.
_ निलेश लंके
आमदार,पारनेर
हा राज्यातला विक्रमी विजय असुन,तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा विजय आहे. आमचं हमाल मापाडीचं शिट येणार असं समजुन भाजपाने अगोदर फटाके वाजवले पण ते स्वप्नच ठरले.पद्मजा पठारेंना विक्रमी ९२३ मते मिळाली हा महाराष्ट्रातील मोठा विक्रम ठरेल. प्रशांत गायकवाडांना नेहमीच पहील्या क्रमांकाची मते मिळतात.बापु शिर्केंनी शेवटच्या चेंडूवर चौकार मारल्याने विरोधकांच्या उरल्या आशाही मावळल्या.सर्व १८ उमेदवार विक्रमी मतांनी विजयी झाले. आमचे राजकारण हे सर्व समावेशक आहे.प्रवरेचा मलीदा इकडे आला पण तो विश्वासु माणसांकडेच राहीला त्यामुळे मतांची आकडेवारी, कुबड्या,टेकु नको आता १० वर्ष विरोधकांनी इकडे फिरकु नये.तब्बल २० वर्षांनी १०/० मार्केट कमीटी झाली.आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे हे शक्य झाले.तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा विजय आहे.
विजयराव औटी
मा.उपाध्यक्ष
विधानसभा महाराष्ट्र राज्य.
नगर जिल्ह्यात भाजपा सेनेने बहुतांश बाजार समितीत विजय संपादन केला.पारनेर तालुक्यामधे आमच्या विरोधामधे सर्वजण एकत्र आले तिथे आमच्या उमेदवारांनी चांगली लढत .देत ४५ टक्के मते एकट्या भाजपाने मिळवली यावर आम्ही समाधानी आहोत. जिल्ह्यात भाजपा शिवसेनेने एकत्रितपणे चांगली कामगीरी करत यश मिळवले.पारनेरची निवडणुक प्रतिष्ठेची कधीच नव्हती.जे सगळे एकत्रितपणे माझ्या विरोधात एकत्र आहे त्याचा मला आनंद असुन,आता संघटना वाढीसाठी आम्हाला मदत होईल.आमचा पंकज कारखिले ३ मतांनी पराभुत झाला.पारनेरचा दिलेला निकाल हा आमचा मी विजयच आहे हे माझे व्यक्तीश: मत असुन,या निवडणुकीचा परीणाम येणार्या जिल्हापरीषद व पंचायत समिती निवडणुकीतुन दिसुन येईल असा विश्वास आहे.
सुजय विखेपाटील
खासदार,नगर दक्षिण
0 टिप्पण्या