Vaijapur: वैजापूर बाजार समिती शिवसेना भाजप युतीकडे

 


युतीला अकरा तर आघाडीला केवळ सात जागावैजापूर : 


वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार रमेश पाटील बोरनारे व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या अधिपत्याखालील बळीराजा सहकारी विकास पॅनलने अकरा जागा जिंकुन आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.‌ त्यांच्या विरोधात एकत्रये ऊन लढणाऱ्या कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस, ठाकरे गट शिवसेना, वंचित आघाडी व भाजपाचे काही उमेदवार यांच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे ही बाजार समिती सेना भाजपा युतीच्या ताब्यात गेली आहे. जनतेने विकास कामांना कौल दिल्याची प्रतिक्रिया विजयी मिरवणुकीनंतर आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी दिली. 


निवडणुक निर्णय अधिकारी विनय धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड मधील गोदामात आठ टेबलवर सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली व दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले. सहकार संस्था मतदार संघातुन आमदारांच्या पॅनलचे काकासाहेब पाटील (७३८ मते), कल्याण जगताप (५९७ मते), रामहरी जाधव (६७५ मते), कल्याण दांगोडे (६७६ मते), शिवकन्या पवार (६३८ मते), रजनीकांत नजन (६९२ मते) हे उमेदवार निवडून आले. या मतदारसंघात माजी सभापती भागिनाथ मगर (५६७ मते), कचरु डिके (४५३ मते), धनंजय धोर्डे (५४४ मते), शिवाजी गोरे (५७६ मते) या दिग्गजांचा पराभव झाला. तर ग्रामपंचायत मतदार संघातील आमदार पॅनलचे गणेश इंगळे (६८९ मते), प्रवीण पवार (४९९ मते), प्रशांत त्रिभुवन (६२० मते) व गोरख आहेर (५५० मते) हे चारही उमेदवार मोठ्या फरकाने निवडुन आले. या पॅनलचा व्यापारी मतदारसंघातुन एकही उमेदवार निवडून आला नाही. पॅनलचे सुरेश तांबे (७६ मते) व नितिन बोहरा (५५ मते) यांना पराभवाची धुळ चाखावी लागली.‌ हमाल मापाडी मतदार संघात पॅनलचा बाबासाहेब गायकवाड (१६४ मते) हा उमेदवार २३ मतांनी निवडून आला. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, एकनाथ जाधव, भाऊसाहेब ठोंबरे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सहकारी संस्था मतदार संघात अविनाश गलांडे (७२९ मते), ज्ञानेश्वर जगताप (५९४ मते),संजय निकम (६५८ मते), अनिता वाणी (८५२ मते), प्रशांत सदाफळ (७१४ मते) व व्यापारी मतदार संघातुन विजय ठोंबरे (८७ मते) व शेख रियाज शेख अकिल (९९ मते) हे सात उमेदवार विजयी झाले. या पॅनलचे जे.के. जाधव (५६९ मते), रिखबचंद पाटणी (४७५ मते) बाळासाहेब भोसले (५३१ मते), द्वारका पवार (४९२ मते), यशवंत पडवळ (४२७ मते), अमृत शिंदे (४९३ मते), रविंद्र पगारे (१४१ मते) हे उमेदवार पराभूत झाले. आमदार पॅनलच्या उमेदवारांची विजयी मिरवणुकीचा समारोप आमदार संपर्क कार्यालयात झाला. यावेळी आमदार रमेश पाटील बोरनारे, जिल्हा बॅंकेचे आप्पासाहेब पाटील, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, खुशालसिंह राजपूत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र साळुंके, दिनेश राजपूत, पारस घाटे आदींची उपस्थिती होती.     


तापलेल्या राजकारणात वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली,खेळी मेळीच्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत मतदार राजाने पॅनल टू पॅनल मतदान न करता क्रॉस वोटिंग केली ज्यामुळे मतमोजणी सुरू झाल्यावर चित्र काय स्पष्ट होत नव्हते,यामुळे उमेदवारांच्या कपाळावर घाम फुटला होता,मात्र अखेरच्या डावात शिवसेना शिंदे भाजपच्या युतीच्या बळीराजा शेतकरी विकास पॅनलचे 11 तर आघाडी व भाजपचा बंड पुकारलेला ब गट यांच्या शेतकरी विकास पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले,भाजपचे दिग्गज व राज्य कार्यकारणीतील नेते व इतर कार्यकर्ते यांचा साथ असताना देखील शेतकरी विकास पॅनलला बहुमत प्रस्थापित करता आले नाही,मात्र अपघातातून रीकव्हर करत असलेले डॉ.दिनेश परदेशी हेच तालुक्याच्या भाजपचे बॉस आहे हे मात्र आता स्पष्ट झाले आहे,डॉ.परदेशी यांनी घरात बसूनही निवडणुकीत चानक्या प्रमाणे चक्रे फिरवून यश संपादित केले,तर बोरनारे यांनी ग्रामीण भागात केलेल्या विकासाची पावती त्यांना या निवडणुकीच्या निकालातून मिळाली आहे.


राष्ट्रवादी आऊट !या निवडणुकीत भाजपाचे दोन, शिंदे गट शिवसेना, आप्पासाहेब पाटील यांचे दहा, कॉग्रेसचे दोन व ठाकरे गट शिवसेनेचे चार उमेदवार निवडून आले. मात्र राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला भोपळा फोडता आला नाही. राष्ट्रवादीचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे राष्ट्रवादीचे पंकज ठोंबरे व जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांचा वाद चव्हाट्यावर आला. ओबीसींवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एल.एम. पवार यांनी दिली.‌ ग्रामीण भागातील विकास कामांची पावती 


ग्रामीण भागात केलेल्या विकास कामामुळे ग्रामपंचायत मधून सर्व उमेदवार निवडून आल्याने ही आपल्या कामाची पावती असल्याचे आमदार बोरनारे यांनी व्यक्त केले


तालुक्यात डॉ.दिनेश परदेशीच भाजपचे बॉस


भाजपचे काही पदाधिकारी यांनी राजकीय वैरी असलेल्या आघाडी सोबत जाऊन पॅनल प्रस्थापित केले मात्र त्यांना बहुमत मिळवण्यात अपयश आले,यामुळे भाजपचे बॉस डॉ.दिनेश परदेशी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे


फोटो: बळीराजा विकास पॅनलच्या उमेदवारांनी काढलेल्या विजयी मिरवणुकीला आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या