दबक्या पावलांनी आला बिबट्या ; उशाजवळच कुत्र्याची शिकार करून गेला.....

तरुण थोडक्यात बचावला




आळेफाटा :

 नगर कल्याण महामार्गावर आळेफाटा (ता.जुन्नर) परिसरातील ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स पत्रा शेडमध्ये असणाऱ्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार करून पसार झाल्याची घटना रविवारी (१४ मे) मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारस घडली. यात शेडमध्ये झोपलेला तरुण मात्र बचावला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.


आळेफाटा परिसरातील कल्याण रोडवर सुदामा मुन्निलाल शर्मा यांचे ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स या नावाने रिपेअरिंगचे गॅरेज आहे. रविवारी रात्री दिवसभरातील कामे आटोपून त्यांचा मुलगा सुधाकर व पाळीव कुत्रा नेहमीप्रमाणे पत्र्याच्या शेडमध्ये झोपले. मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास बिबट्या वाहनांच्या आडोशाने दबक्या पावलांनी आला. 


बिबट्याने अचानक कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्याचा आवाज आल्याने सुधाकर यास जाग आली. मात्र, डोळ्यादेखत बिबट्याने कुत्र्याची शिकार करून बिबट्या पसार झाला. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यापूर्वीही अनेकदा बिबट्याने कुत्र्यांची शिकार केली असल्याची सुदामा शर्मा यांचे म्हणणे आहे. या परिसरात तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या