झाडांचा वाढदिवस केला साजरा....

 

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश 


बारामती (दि:२४)

झाडांचा वाढदिवस साजरा करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  शहराध्यक्ष जय पाटील व त्यांच्या टीमने दिला आहे.

 एखाद्याचा वाढदिवस साजरा करणे ही संकल्पना काही नवीन नाही. राजकीय नेत्यांचा वाढदिवस तर दर वर्षी धुमधडाक्यात साजरा होत असतो. यासाठी सार्वजनिक मोक्याच्या जागी भव्य फलक हे ठरलेलेच असतात. तसेच एखादा जीवापाड प्रेम असलेल्या जनावरांचाही वाढदिवस उत्साहाने साजरा करतो. मात्र एखादे झाड अन् तेही स्वत जोपासलेले. अशा झाडाचा वाढदिवस साजरा करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

बारामती शहरातील माऊली नगर परिसरामध्ये आनंद फ्लावर गार्डन ही एक लोकसहभागातून उभी राहिलेली एक बाग आहे . मागील वर्षी मे महिन्यामध्येच या गार्डनचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते  झाले होते. या बागेमध्ये भारतामध्ये असलेली भारतीय वंशाचे एक साधारणता तीस-पस्तीस प्रकारची फुल झाडे लावलेली आहेत. आणि या झाडांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी येथील परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन साजरा केला. या प्रसंगी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

------------------------------------------

*चौकट :-

"ज्या प्रकारे आपण माणसं जपतो आणि माणसांचे वाढदिवस साजरा करतो..तसेच इथून पुढच्या काळामध्ये झाडे जपणं देखील तितकच गरजेचे आहे. त्याच भावनेतून आज झाडांचा वाढदिवस साजरा केला आहे..आजच तापमान आपण पाहिलं निसर्गाची बदललेली परिस्थिती बघितली तर झाड नुसती लावून चालणार नाही तर ती जगवली पण पाहिजे".

              जय पाटील 
(शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या