राहुरी बाजार समितीच्या सभापतीपदी अरुण तनपुरे बिनविरोध


      
राहुरी शहर प्रतिनिधी

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अरुण तनपुरे व उपसभापती गोरक्षनाथ तुकाराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित जनसेवा मंडळांनी विखे कर्डिले गटाचा धुवा उडवत १८ पैकी १६ जागा जिंकून बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे.

काल सभापती निवडीच्या वेळी अरुण बाबुराव तनपुरे यांच्या अर्जावर सूचक म्हणून दत्तात्रय कवाने तर अनुमोदक म्हणून बाळासाहेब खुळे यांच्या स्वाक्षरी होत्या तर उपसभापती पदासाठी गोरक्षनाथ तुकाराम पवार यांच्या अर्जावर सूचक म्हणून दत्तात्रय शेळके तर अनुमोदन म्हणून महेश पानसरे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप रुद्राक्ष व सहाय्यक म्हणून जरे यांनी काम पाहिले 
निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून फटाक्याच्या आतषबाजीत सभापती अरुण तनपुरे व उपसभापती पवार यांचे स्वागत केले 

यावेळी नवनिर्वाचित संचालक सुरेश बाफना, दत्तात्रय कवाने, सुनीता खेवरें, सत्यजित कदम, श्याम काका निमसे, दत्तात्रय शेळके, रखमाजी जाधव, मंगेश गाडे, शारदा आढाव, शोभा डुकरे, बाळासाहेब खुळे, मारुती हारदे, चंद्रकांत पानसंबळ, मधुकर पवार ,महेश पानसरे ,रामदास बाचकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सभापती अरुण तनपुरे व उपसभापती गोरक्षनाथ पवार यांचा प्रेरणा मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे प्रभाकर पान संबळ नगरसेवक नंदकुमार तनपुरे डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डौले संदीप सोनवणे अण्णासाहेब बाचकर सुभाष डुकरे सचिन भिंगारदे विजय माळवदे अशोक ढोकणे , विठ्ठल तमनर आदींनी त्यांचा सत्कार केला.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या