तयारी संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याची...

 जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या बैठक...

दत्ता गाडगे/ राष्ट्र सह्याद्री 

पारनेर : 
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील श्रीसंत निळोबाराय यांचे आषाढी वारीनिमीत्त श्रीक्षेत्र पिंपळनेर ते पंढरपूर अशा पायीदिंडी पालखी सोहळ्याचे दि.१४ जूनला पिंपळनेर येथुन प्रस्थान होत आहे. सदर पायीदिंडी पालखी सोहळ्यामधे अनेक मोठ्या दिंड्यांचा समावेश असुन साधारणत: १ लाखापेक्षा जास्त वारकरी बांधव या सोहळ्यात सहभागी होत असतात.

  श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखीसोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर यावर्षी आयोजित केला आहे. अनेक दिंड्यांचा सहभाग या सोहळ्यात असणार आहे म्हणुन त्यादृष्टीने सर्व दिंड्यांना व वारकरी बांधवांना सर्व सुविधा मिळाव्यात तसेच इतर सुविधा पुरविणे आदी विषयावर आज दि.३० मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांचे अध्यक्षतेखाली महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.पायीदिंडी पालखी सोहळ्या २०२३ चे अनुषंगाने शासनाकडुन अॅम्ब्युलन्स, वैद्यकीय सेवा,पोलीस बंदोबस्त,एस्काॅर्ट,वायरलेस,पोलीस व्हॅन व पाण्याचे टँकर आदी सुविधांची नितांत गरज असते.

त्यासाठी या बैठकीमधे वारकर्‍यांना पिण्याच्या पाण्याचे टंकर, स्वयंपाकाचा गॅस, आरोग्य पथक, पोलीस संरक्षण उपलब्ध करुन देणेबाबतची विनंती करण्यात आली होती.

या बैठकीसाठी श्रीसंत निळोबाराय संस्थान पिंपळनेरचे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत,श्रींसंत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर, नाशिक यांनी दिंड्यांच्या सुविधां संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालया  कडे दि. ७ मे रोजी पत्राद्वारे मागणी केली होती.त्याच विषयान्वये हि बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामधे आयोजित केली आहे.

सदर महत्वाच्या बैठकीसाठी पोलीस अधिक्षक अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अहमदनगर, आयुक्त महानगर पालिका अहमदनगर, जिल्हा शल्य चिकीत्सक अहमदनगर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. अहमदनगर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर, कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणीपुरवठा विभाग जि.प.अहमदनगर, उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अहमदनगर, जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर, नायब तहसीलदार, आपत्ती व्यवस्थापन, मदत, पुनर्वसन जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर आदीं उपस्थित राहणार आहेत.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या