दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - चेअरमन बा. ठ.झावरे.
Datta Gadage / Rashtra Sahyadri
पारनेर :
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील दत्तनगर येथे गुरुवार दि.१ जुन रोजी श्री विद्या नृसिंह भारती करवीर पीठ कोल्हापूरचे श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते गुरुवारी दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होणार असल्याची माहिती श्री गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बा.ठ.झावरे यांनी दिली. या निमित्ताने बुधवार व गुरुवार या दोन दिवसामधे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि.३१ मे २०२३ श्री दत्तमुर्ती मिरवणुक सोहळा सायंकाळी ५ ते ७ होणार असुन, नवनाथ वारकरी शिक्षण संस्था निमगाव वाघा श्री भाऊसाहेब महाराज भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ वासुंदे मिरवणूक सहभाग राहणार आहेत.सायंकाळी ७.०० नंतर श्री दत्तमुर्ती धान्याधिवास होणार आहे.
तसेच गुरुवार दि.१ मे २०२३ सकाळी ७ ते ९ गृहप्रवेश व सत्यनारायण महापूजा सकाळी ९.३० ते ११ श्री विद्या नृसिंह भारती करवीर पीठ कोल्हापूर श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य स्वामी यांची मिरवणूक सकाळी ११.३०वा.मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा,दुपारी १२ ते १ श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य स्वामी प्रवचन व दर्शन सोहळा व दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्योजक स्वप्निल झावरे यांनी दिली आहे.या दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रमप्रसंगी ह.भ.प.डॉ.नारायण महाराज जाधव (अलंकापुरी), कृष्ण कृपाकिंत डॉ.विकासानंदजी महाराज मिसाळ (संत पंढरी पिंपळगाव वाघा), ह.भ.प. एकनाथ महाराज चतर शास्त्री (कान्हूर पठार),ह.भ.प. जनार्दन महाराज मुंडे (पिंपळगाव रोठा, ह.भ.प. वत्सला आका (शिंगवे दत्ताचे), ह.भ.प. गुरुवर्य अण्णाकाका पोळ (पळशी),ह.भ.प.भागवताचार्य रमेश महाराज कुलकर्णी (वासुंदे), ह.भ.प.धनंजय महाराज उदावंत (वासुंदे) आदि उपस्थित राहणार आहेत,तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बा.ठ.झावरे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या