Politics: पालकमंत्री विखे पाटलांनी पक्षाविरोधात जाऊन पवारांना मदत केली

 आमदार प्रा. राम शिंदे यांचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर आरोप

 बाजार समिती सभापती उपसभापती निवडीवरून भाजप पक्षांतर्गत वाद



जामखेड : बाजार समिती निवडणुकीत आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या गटाला समसमान प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. सभापती उपसभापती निवडीतही सभापती शिंदे गटाचा तर उपसभापती पवार गटाचा झाला. सभापती निवडीत राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी करत विखे पाटील यांच्या पक्ष विरोधी कारवायांची पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. भाजप म्हणजे काँग्रेस नाही, आम्ही तीन वर्षे या पक्षात काम करतो. येथे शिस्तीनेच राहावे लागेल, असा इशारा द्यायलाही शिंदे विसरले नाहीत. 

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही राम शिंदे आणि  रोहित पवार गटाचे समसमान 9 -9 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली यात भाजपाने मारली बाजी आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे शरद कारले हे विजयी झाले आहेत. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली.

निवडीनंतर आ. राम शिंदे यांनी सभापती कारले यांचा सत्कार प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी पहिल्याच दिवशी बोललो होतो, सभापतींची ईश्वर चिठ्ठी ही आमचीच निघणार आहे. सभापती शरद कार्ले झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांचे आम्हाला सहकार्य अपेक्षित होते. परतुं ते मिळाले नाही. त्यांचे पीए व त्यांचे बंधू  यांनी आमच्या विरोधात फॉर्म भरला. एक कार्यकर्ता होता तो पण विरोधात गेला. त्यांनी आम्हाला सहकार्य करतो म्हणून सांगितले. आम्ही त्यांना उमेदवारी देतो म्हणून सांगितले. पण त्यांनी पहिल्याच दिवशी पासून आम्हाला विरोध केला व त्यांनी आमच्या विरोधात उपसभापती साठी फॉर्म भरला. आमच्या भाजपाचे कार्यकर्ते यांनी खुप मेहनत घेतली. ही निवडणूक यवढया मोठ्या शक्ती पवार यांच्या विरोधात लढली व जिल्हा बँकेच्या संचालक विरोधात लढली. आमच्याच भाजपाचे  खासदार सुजय विखे  यांच्या विरोधात लढली. शेवट लोकांनी आम्हालाच कौल दिला. परतुं भाजपाने खासदार केले, आमदार केले, पालकमंत्री केले, परत महसुल मंत्री केले. यापेक्षा त्यांना काय हव आहे? कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत त्यांनी असे वागणे गैर आहे. मी पक्ष नेतृत्वाच्या देखील हा विषय कानावर घातला आहे. 

आमदार रोहित पवार व खासदार सुजय विखे यांचेच एकत्रित पॅनलचे  हे उमेदवार होते. आम्ही दिड महिना याच्यावर कोठे भाष्य केले नाही. शेवटच्या क्षणी का होत नाही आम्ही सत्तेत आहोत. आमचे आमदार आहेत, आमचे खासदार आहे, मंत्री आहे, आमची राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे. पण विखे ज्या पक्षात असतात त्या पक्षाच्या विरोधी काम करतात, असं लोक सांगत होते त्याचा प्रत्येक आज आम्हाला आला, असेही आ. राम शिंदे यांनी बोलून दाखविले.



दरम्यान, कृषि उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती कैलास वराट हे खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक आहे व आज निवडणूक दरम्यान खासदार सुजय विखे यांचे पीए शेवट पर्यंत ठाण मांडून बसलेले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या