आदिपुरुष'चा रिलीजआधीच धमाका, रिलीजआधीच केली 432 कोटींची कमाई!


प्रभास  आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा  'आदिपुरुष' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 16 जून 2023 रोजी हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने 432 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजआधीच 432 कोटींचा गल्ला जमवला आहे. थिएट्रिकल राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्यूझिक राइट्स, डिजिटल राइट्स अशा अनेक गोष्टींमधून या सिनेमाने रिलीजआधीच चांगलीच कमाई केली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता 68 कोटी रुपयांची कमाई केल्यास या सिनेमाचं बजेट पूर्ण होईल. 

आदिपुरुष' हा सिनेमा 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करणार याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. पण रिलीजच्या पहिल्या दिवशीच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेप्रेक्षकांचा 'आदिपुरुष' या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील सिनेप्रेमी या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमावर टीका होत आहे. पण तरीही देशभरातील सिनेप्रेमींना या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या