मोठ मोठ्या नेत्यांना थांबवले, पारनेरचा नेता माझ्यासाठी किरकोळ-खा.सुजय विखे पा.




( पारनेर प्रतिनीधी ) : -आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रातील मोठ, मोठ्या नेत्यांना थांबवण्याचे काम  केलंय,पारनेरचा नेता आपल्यासाठी किरकोळ आहे.नागरीकांचे प्रश्न सोडवत आपण लोकसंग्रह जमा केला आता हि जनताच योग्यवेळी विरोधकांना उत्तर देईल असा आत्मविश्वास खा.विखे पाटील यांनी व्यक्त केला.पारनेर तालुक्यातील निघोज येथे संदिप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळ पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार खा.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आता.

यावेळी बोलताना खा.विखेपाटील म्हणाले,आता कोणतीही निवडणूक आली की, पारनेर तालुक्यातील विरोधक फक्त विखेंनाच टार्गेट करतात.एक आमदार,दोन माजी आमदारांच्या मदतीने निवडणूक लढवतो.यांनी ज्यांना माजी केले तेच आता विद्यमान आमदारांच्या मांडीला मांडी लावुन बसतात.इथली जनता हुशार आहे.बाजार समीतीमधे असलेल्या मतदारांनीच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधकांना भुईसपाट केले.लोकांना आता आमरस, बिर्याणी आणी फेटे चालत नाही तर, विकास कामांचा करिष्मा चालतो.महसूल आपल्या दारी या कार्यक्रमात निघोजकरांना चांगला लाभ मिळाला.मागील तीन साडेतीन वर्षात तालुक्यातील जनतेमधे असुरक्षिततेटी भावना मोठ्या प्रमाणात वाढली आहे.पारनेर तालुक्यात तहसीलदार येण्यासाठी घाबरतात.पारनेर पेक्षा गडचिरोली बरी अशी प्रतिक्रिया अधिकारी म्हणतात.काम करणार्‍या अधिकार्‍यांना येथे मारहाण होते.सत्तेचा एवढा माज बरा नाही. आघाडी सरकारच्या काळात आमच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी करुन,मोठ्या प्रमाणात त्रास दिला. सुजित पाटील झावरे,सचिन वराळ सारखे सच्च्या दिलाचे कार्यकर्ते हिच आपली ताकद आहे.पारनेर तालुक्यातील ३०० विद्यार्थ्यांना एमपीएस्सीच्या अभ्यासासाठी विखे पाटील अकॅडमी सुरु करण्याचा निर्णय सचिन पाटील वराळ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण घेत आहे आणि हिच विखे परीवारा कडून त्यांना भेट असे खासदार विखे म्हणाले,सरकार कुणाचेही असो तालुक्यातील विद्यार्थी अधिकारी होवुन मोठमोठ्या पदावर जातील हि सर्वात मोठी सत्तेची चावी आपल्या कडे राहणार आहे.हिच विखे पाटील अॅकॅडमीची संकल्पना आहे.येथील खिलारी, रोहकले, वराळ कुटुंबाने सुरवातीपासून खा.बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर निष्टा ठेउन काम केले.

सत्कारमूर्ती सचिन पाटीत वराळ म्हणाले,विखे कुटुंबाने आमच्या कुटुंबाला भरभरुन दिले,बाजार समिती उपसभापती,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, सरपंचपद आदी पदे विखे पाटील यांनी दिलेल्या विकासकामुळे जनतेने आम्हाला दिली.सध्या ३० कोटीच्या स्वच्छ पाणीपुरवठा योजनेचे काम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातुन सुरु आहे.

याप्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील,पुणे जि.प.चे माजी सभापती मंगलदास बांदल,भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राहुलपाटील शिंदे,मा.सभापती गणेश शेळके, शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहकले,कॅप्टन विठ्ठलराव वराळ,संपदा पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव वराळ, कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके,सरपंच दत्ता पवार,सरपंच पंकज कारखीले,संदीप सालके, सतिष म्हस्के आदींसह मान्यवर मोठ्या संखेने हजर होते.

स्वर्गीय संदीप पाटील वराळ यांनी  अनेक वर्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अढळ निष्ठा ठेवत स्वत:ला जनसेवेसाठी वाहून घेतले.स्वर्गीय संदीप पाटील वराळ यांची विखे परीवारा वरील निष्ठा अढळ होती.असा कार्यकर्ता परत होणे नाही.असे वेळी खासदार  सुजय विखे पाटील म्हणाले 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लहू साबळे यांनी केले तर,आभार निलेश घोडे व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश ताळगे यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या