राऊत व भवार यांच्या अटकेसाठी तीन पोलीस पथक रवाना


निपाणी वडगाव हत्या प्रकरणश्रीरामपूर -

तालुक्यातील निपाणी वडगाव येथील रमेश पवार हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सोपान राऊत व प्रसाद भवार यांच्या अटकेसाठी पोलिसांनी तीन पथक नेमली असून, यासाठी सायबर पोलिसांची ही मदत घेत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

 निपाणी वडगाव येथील वाहन चालक रमेश पवार याचा  दोन महिन्यापूर्वी गळा दाबून खून करण्यात आला होता, याप्रकरणी पवार यांची पत्नी सविता व नंतर अजय गायकवाड याला अटक करण्यात आली ,आरोपी सविता पवार हिला न्यायालयीन कोठडी तर अजय गायकवाड याला 16 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 अनैतिक संबंधांना अडचण येते म्हणून सोपान राऊत व सविता पवार या दोघांनी रमेश पवार याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला त्यानुसार अजय गायकवाड व प्रसाद पवार यांना बरोबर घेऊन हे हत्याकांड करण्यात आले. 3 एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रसाद व अजय व मृत रमेश हे तिघे निपाणी वडगाव येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या तळ्याजवळ गेले ,तेथे रमेश यांना दारू पाजली व प्रसाद ,अजय यांनी गळा दाबून त्याचा खून केला. गावातील एक टेम्पो बोलावून त्यात रमेश यांचा मृतदेह ठेवून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आणून टाकला ,

दरम्यान मृत रमेश यांची पत्नी सविता, बहिण शांताबाई वैद्य व एक जण आला त्यांनी रमेश यांना उचलून घरी नेले दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यविधीची तयारी केली. यावेळी पोलिसांना निनावी फोन करण्यात आला त्यात संबंधिताने या मृत्यू बाबत संशय व्यक्त केला, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेतला जास्त दारू सेवन केल्याने रक्ताच्या उलट्या होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे माहिती सविता हिने पोलिसांना सांगून शिवविच्छेदन करण्यास विरोध केला. मात्र पोलिसांनी त्याचं अवस्थेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेला त्यात पवार यांचा गळा दाबून खून केल्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन महिन्यानंतर मृताची पत्नी सविता व नंतर अजय गायकवाड याला अटक केली.

 याप्रकरणी प्रसाद भवार साक्ष दिली होती त्याला अशोक नगर परिसरात मारहाण झाली त्या संदर्भात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला, बचावासाठी त्यांनी खोटी साक्ष दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले ,भवार व राऊत हे दोघेही पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. यासाठी पोलिसांनी तीन पथक तैनात केली असून या कामी सायबर पोलिसांची ही मदत घेत असल्याचे पोलीस उपाधीक्षक मिटके यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या