मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वर ऑइल टँकरला भीषण आग! अनेकजण होरपळल्याची भीती;


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात एका ऑइल टँकरला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खंड्याळ्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

खंडाळ्यात लागलेली ही आग एका ब्रिजवर लागली आहे. या आगीच्या झळा खालील रस्त्यावर पोहचल्या. खंडाळ्यातील जुन्या मार्गावरील अन्य 2 वाहनांनी पेट घेतला आहे. त्यामुळेच एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आग लागल्यानंतर पहिल्या अर्ध्या ते पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर किमान तासभरतरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि एक्सप्रेसवे या अपघातामुळे ठप्प झाला आहे. पोलिस यंत्रणा, देवदूत यंत्रणा आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एकाच वेळी 3 वाहनांना आग लगल्याची माहिती मिळत आहे. ही आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन जाणाऱ्या टँकरला ब्रिजवर आग लागली. ही आग इतकी भीषण होती की तिच्या झळांमुळे ब्रिजखालील 2 वाहनांनी पेट घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या