मित्राच्या लग्नाला जाणाऱ्या तिघांवर काळाचा घाला

  बीड जिल्ह्यात नेवाशातील तिघांचा मृत्यू

अति वेगाने घेतला जीवनगर  : 


बीड तालुक्यातील पेंडगावजवळ चालकाचे नियत्रंण सुटून कारचा भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली.

यात नेवासा (अहमदनगर) येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे.

नेवासा येथून मित्राच्या लग्नाला बीडकडे येत असताना पेंडगाव जवळ चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे काही कळायच्या आत तीन ते चार वेळा पलट्या घेत कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात ऐवढा भीषण होता की यात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व बीड ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

धीरज गुणदेजा (वय 30), रोहन वाल्हेकर (वय 32), विवेक कांगुने (वय 33) अशी मृतांची नावे आहेत. तर आनंद वाघ (वय 28) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या