सायकलने एका दिवसात पंढरपूर वारी

 सायकलने एका दिवसात पंढरपूर वारी करत दिला पर्यावरणाचा संदेश..



 एकनाथ भालेकर या तरुणाचा पिंपरी चिंचवड ते पंढरपूर प्रवास..


( पारनेर प्रतिनीधी ) : - 

पुणे जिल्ह्यातील मावळ ॲथलेटीक्स असोसिएशन,वर्ल्ड ऑन व्हील्स व पेडलवाली या संस्थांच्या वतीने पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते.यामधे राळेगणसिध्दी येथील एकनाथ भालेकर यांनी सहभाग घेतला होता.

   पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील तरुण सायकलपटू एकनाथ भालेकर यांनी एका दिवसामधे सायकलने २३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत चक्क पंढरपूर गाठले आहे त्यांनी सायकलवारी एका दिवसातच हा प्रवास पूर्ण केल्याने त्यांच्यावर पुणे शहरासह,पारनेर तालुक्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

  पिंपरी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरातील श्रीगणेशाचे दर्शन घेत त्यांच्या यात्रेला सुरुवात झाली. 

यावेळी प्रतिक्रिया देताना सायकलपटू व पत्रकार मित्र एकनाथ भालेकर म्हणाले, " सायकल चालवा, प्रदूषण टाळा,पर्यावरण वाचवा " असा संदेश देण्यासाठीच या सायकल वारीचे आयोजन केले असल्याचे सांगितले. प्रदूषण रहीत पर्यावरणासाठी सायकल ही काळाची गरज असून तिचा वापर आपण वाढविला पाहिजे. सर्वांनी आपल्याला शक्य असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचाच वापर केला पाहिजे.हाच संदेश देत भालेकर यांनी सायकलचे महत्व अनेक ठिकाणी सांगितले.  

आषाढी एकादशीपूर्वीच पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन घडल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे भालेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.  





एका दिवसात १७ तास केले सायकलिंग...

  यापूर्वी मी दोन दिवसांत २३० किलोमीटरचे अंतर पुर्ण करत राळेगणसिद्धी ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण केली होती.तसेच राळेगणसिद्धी ते पुणे,पुणे ते राळेगणसिद्धी आणि अहदनगर ते शिरुर अशा विविध सायकल दौऱ्यांचा अनुभव पाठीशी होता.

त्यामुळे यंदाच्या वर्षी हि वारी एका दिवसात पूर्ण करण्याचे करण्याचे नियोजन मनस्वी केले होते.मागील अनुभवाच्या जोरावर आम्ही, शनिवारी दि.१० जून रोजी पहाटे ३ वाजता पुण्याहून पंढरपूरकडे प्रस्थान करत सायंकाळी ७ वाजता तब्बल १७ तासांचा प्रवास करत आमची सायकलवारी पंढरीच्या पांडूरंगाच्या दरबारात पोहचली.

एकनाथ भालेकर, 

सायकलपटू,

पुणे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या