सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ॲडव्हान्स सॅलरी


सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी . आता सरकारी कर्मचारी ॲडव्हान्स सॅलरीचाआनंद घेऊ शकतात. देशात पहिल्यांदाच ही सुविधा लागू करण्यात येणार आहे. परंतु ही सुविधा लागू करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे. ही घोषणा पहिल्यांदाच राजस्थान सरकारने केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत   यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आणि बढतीच्या प्रक्रियेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

या नवी सुविधा 1 जूनपासून लागू करण्यात आली. याआधी कोणत्याही राज्याने ॲडव्हान्स सॅलरीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला नव्हता, परंतु ही सुविधा पहिल्यांदाच राजस्थान राज्यात लागू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे राज्यातील सरकारी कर्मचारी त्यांच्या वेतनातील काही रक्कम ही ॲडव्हान्स सॅलरी म्हणून काढता येणार आहे. राजस्थान सरकारने या निर्णयाची घोषणा करत 20 हजार रुपयांपर्यंत ॲडव्हान्स सॅलरी मिळणार असल्याचं सांगितलं आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या