पारनेर खरेदी विक्री संघावर विखेपाटील यांच्या जनसेवा पॅनेलचा दणदणीत विजय..

 


महाविकास आघाडीचा दारुण पराभव..

दत्ता गाडगे l राष्ट्र सह्याद्री 

( पारनेर ) : -

पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचा निकाल रविवार दि.४ जुन रोजी जाहीर करण्यात आला.न्यु इंग्लिश स्कुल मधे दूपारी ४:३० वाजता मतमोजणी झाली.या निवडणुकीमधे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खासदार सुजय विखेपाटील यांच्या मार्गदर्शना खाली जनसेवा पॅनेलने सर्व जागांवर विजय मिळवत खरेदी विक्री संघावर आपली सत्ता आणली.सर्व १५ जागा या भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या युतीला मिळाल्या.१४ जागांसाठी सोसायटी मतदार संघात १०० टक्के,वैयक्तिक मतदार संघात ९६ टक्के मतदान झाले.एकुण २७४ मतदारांपैकी २५५ मतदान झाले.तर,सेवा संस्थेमधे ११६ पैकी ११६ मतदारांनी मतदान केले.वैयक्तीक मतदार संघात १२ मतदार मयत तर २ आजारी होते ते मतदान होवु शकले नाही.

जनसेवा पॅनेलच्या प्रचाराची धुरा अहमदनगर जि.प.चे मा.उपाध्यक्ष सुजित झावरेपाटील, राहुलपाटील शिंदे,शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले यांच्यावर होती. यशस्वी नियोजन करत भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यात सर्व डावपेच यशस्वी ठरले.

तर महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनेलचे नेतृत्व आमदार निलेश लंके,मा.आ.विजयराव औटी, मा.आ.नंदकुमार झावरे यांचे चिरंजीव राहुल झावरे यांनी केले होते.मात्र महाविकास आघाडीला या निवडणुकी मधे खातेही खोलता आले नाही.

 


जनसेवा पॅनेलचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे : 


सोसायटी/संस्था मतदार संघ :
१)पिंपरकर सतिष राजाराम -७२
२)कावरे प्रमोद बबनराव-७०
३)अलभर बाजीराव रामचंद्र-६९
४)पावडे संग्राम बाळासाहेब-६९
५)रोकडे दत्तात्रय जयराम-६४
६)रोहोकले गंगाराम भानूदास-६४
७)शितोळे प्रसाद भरत-६३
८)पवार सुनिल बाळू-६१
व्यक्तीगत मतदार संघ :
९)खिलारी रघुनाथ माधवराव-१३९
१०)औटी शैलेंद्र संपतराव-१२४
अनु.जाती जमाती प्रतिनीधी : 
११)पठारे मधुकर हरीभाऊ-
महीला प्रतिनिधी :
१२)ठुबे ज्योती संदिप-२१६
१३)मते रेखा संजय-२०६
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :
१४)शिंदे अण्णा बबन-२१०
भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी :
१५)मेचे भाऊसाहेब महादू-२००


निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन आर.बी.वाघमोडे पारनेर तालुका सहकारी खरेदीविक्री संघ मर्या.पारनेर यांनी काम पाहीले.


यावेळी प्रतिक्रिया देताना,अहमदनगर जि.प.चे मा.उपाध्यक्ष व भाजपाचे नेते सुजीत झावरेपाटील म्हणाले,राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखेपाटील व खासदार सुजय विखेपाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने पॅनेल तयार केला.बर्‍याच लोकांना असे वाटत होते बाजार समीतीला जसा निकाल लागला तसाच निकाल आत्ताही येईल अशी शक्यता अनेक राजकीय धुरीण व पत्रकारांनीही वर्तविली होती.सकापासुनच तालुक्याचे लोकप्रतिनीधी ठाण मांडून बसले होते.कुठलीही निवडणुक हि अंतिम नसते,बर्‍याच वेळा एखाद्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एवढं हुरळुन जायचं नसतं.बाजार समीती जिंकल्यावर जग जिंकल्याचा आविर्भाव काहींना होता.परंतु पारनेरच्या सुजान असलेल्या जनतेने हा गैरसमज दूर केला.सर्व १५ जागा भारतीय जनता पार्टीच्या जनतेने निवडूण दिल्यात.यापुढील काळामधे जिल्हापरीषद,पंचायतसमीती,

विधानसभा,लोकसभेसाठी हा विजय निश्चितच प्रेरणा व नांदी ठरेल. काहींना असे वाटले होते विरोधकांना खातेही खोलता येणार नाही.परंतु दिवस कुणाचेही बसून राहत नाहीत.परंतु संयम राखणे गरजेचे असते.बाजार समीती तिरंगी होईल असे वाटत होते.परंतु एक आजी व दोन माजी आमदारांनी एकत्र येत आम्हाला घाटात रोखण्याचा प्रयत्न केला.सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण काय करु शकतो हे जनतेने मतदानाच्या रुपाने दाखवुन दिले आहे.मीच सर्व सत्ता मिळवतो,मी सत्ता गाजवतो अशा वल्गना करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून दिली.आता मरगळ झटकली आहे.कार्यकर्ते पुढील निवडणुकीला पुर्ण ताकदीनिशी सामोरे जातील.विखे पॅटर्ण यापुढे चालणार नाही असे समजणार्‍यांना जनतेने जागा दाखविली.दिशाहिन तालुक्याला दिशा देण्यासाठी काम करु.जनता ज्याला डोक्यावर घेते त्याला डोक्यावरुन उतरवू शकते त्यासाठी गर्व करु नये असे लोकप्रतिनिधींना नाव न घेता सुनावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या