ओडिशा रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर, मानवी चुकीमुळे घडला अपघात? रेल्वेमंत्री म्हणाले...ओडिशामध्ये झालेल्या भीषण अपघाताचं कारण समोर आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशाच्या बालासोरमध्ये एक्सप्रेस आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात 288 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकींग सिस्टीममुळे घडल्याचं समोर आलं आहे. या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्यावर भर असल्याचंही रेल्वेमंत्री म्हणाले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सलग दुसऱ्या दिवशी ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातस्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अपघाताचं कारणही सांगितलं आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचंही त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं आहे की, अपघाताचे कारण शोधण्यात आलं आहे. रेल्वे जबाबदार असलेल्यांची ओळख पटली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा मोठा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे.

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामागील खरं कारण समोर आलं आहे. प्राथमिक तपास अहवालानुसार, हा अपघात मानवी चुकीमुळे घडल्याचं समोर येत आहे. सिग्नल चुकल्याने शेकडो निरपराधांना प्राण गमवावे लागले. ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी तीन गाड्यांची भीषण टक्कर झाली होती. या दुर्घटनेत 261 जणांना जीव गमवावा लागला, तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बहनगा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास झालेला हा अपघात भारतीय रेल्वेच्या इतिहासातील चौथा सर्वात भीषण अपघात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या