एमपीएससी टॉपर, दर्शनाचा दुर्दैवी अंत का आणि कसा झाला ?

 दर्शना पवार हत्याकांडातील आरोपी राहुल हंडोरे अटक


पुणे : 

एमपीएससी परीक्षेतील टॉपर दर्शना पवार हत्याप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपी राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक केली. जुना मित्र असलेल्या राहुलला दर्शनाने लग्नासाठी दिलेला नकार हा त्याच्या जिव्हारी लागला. गोड बोलून राहुलने तिला ट्रेकिंगला जाण्याच्या बहाण्याने रायगडावर नेले आणि तिचा घात केला. पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दर्शना पवार कोपरगावची तर राहुल नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील शहा गावाचा. दर्शनाच्या मामाचे घर राहुलच्या घरासमोरच असल्याने दोघांची लहानपणापासून ओळख होते. दोघेही पुण्यात गेल्या काही वर्षापासून एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी आले होते. दर्शनाला यंदा यश मिळाले व ती वन अधिकारी होणार होती. दुसरीकडे राहुल हंडोरे याला परीक्षेत अपयश येत होते. राहुल हा फुड डिलिव्हरीचे अर्धवेळ काम करुन अभ्यास करत होता.
दर्शना सोबत राहुलला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तिने त्याला नकार देखील दिला होता. तिच्या घरचे तिच्या लग्नाचे पहात होते. त्यातून राहुल अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने 'तू माझी नाही होऊ शकत तर, कोणाचीच नाही', असा विचार करुन तिला संपविण्याचा इरादा करुन तिला राजगडावर ट्रेकिंगला घेऊन गेला. जाताना दोघेही व्यवस्थित बोलत होते, असे त्यांना जाताना पाहणाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतरच त्याने तिला लग्नाविषयी विचारले असावे, तिने नकार दिल्यावर त्याने ठरविल्याप्रमाणे तिच्यावर वार करुन खून केला. १२ जूनला सकाळी साडेआठ ते पावणे अकरा या सव्वा दोन तासात हा सर्व प्रकार घडला. दोघे रायगडावर जाताना व नंतर राहुल एकटा खाली उतरताना सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसते आहे.

दर्शना पवार हिचा मृतदेह पोलिसांना १८ जून रोजी सापडला होता. त्यानंतर त्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यामध्ये तिच्या दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहे. यामुळे हा खून असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा प्राथमिक अहवाल आला आहे. अजून विस्तृत अहवाल येणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अन् परिस्थितीजन्य पुराव्यावरुन राहुल आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याचा तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली. राहुल याचे लोकेशन वेगवेगळे येत होते. तो अधूनमधून नातेवाईकांच्या संपर्कात होतो. तो बंगालमध्ये गेला होतो. मग त्याचे लोकेशन मुंबई मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी तयारी केली. पोलिसांनी त्याला मुंबई येथील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक केली. राहुलने पोलिसांना हत्येची कबुली दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या