बलदवा परिवारवर झालेला हल्ला निषेधार्थ मुक मोर्चा


बलदवा परिवारवर झालेला हल्ला निषेधार्थ मुक मोर्चा

सुरेश पाटील


शेवगांव प्रतिनिधी


शेवगांव येथे बलदवापरिवाराची क्रूर हल्ल्याची निषेधार्थात  माहेश्वरी समाज,  यांनी मुक मोर्चा काढण्यात आला.  बालाजी मंदीरापासुन  तहसिलदार  कार्यलयापर्यत हा मुक मोर्चा  काढण्यात आला. यामध्ये  सामाजिक ,राजकीय, सर्व व्यापारी या स्तरातील सर्व शेवगावकर या मूक मोर्चामध्ये सहभागी होते. यामध्ये अनेकानीं आपल्या भावना व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सभापती डॉ.क्षितिज यांनी या आरोपीना पकडून शेवगांवकरांना न्याय द्यावा पाथर्डीचे केदारेश्वर कारखान्याचे. संचालक एडवोकेट प्रताप काका ढाकणे यांनी, बलदवा कुंटुबास  ज्यांनी हल्ला केला ते हल्लेखोर पकडुन पोलीस प्रशासन यांनी त्यांना शासन करावे. असे आपले मनोगत व्यक्त करुन    केले.  यावेळी माहेश्वरी समाजाचे प्रदेश अध्यक्ष  मधुसुदन गांधी यानी माहेश्वरी समाजावर हल्ला झाला म्हणून ऐकञ आलो नाहीत, तर संपुर्ण  शेवगांवकर येथे दहशतीचे वातावरणाखाली आज जगतो. आज या घरात उद्या आपल्या दारत येऊ शकतो आमचे सरंक्षणाची जबाबदारी शासनाची आहे की नाही,अशी त्रीव भावना प्रकट केली. आठ दहा दिवसात  आम्ही वाट पाहवू यां नंतर  प्रत्यैक जिल्हा, तालूकामध्ये  हे आंदोलन छेडले जाईल. असे  मनोगत व्यक्त केले.या मुकमोर्चात आ. मोनिकाताई राजळे यांनी आपल्या मनोगतात एखाद्या समाजापुढे किंवा धर्मासाठी विषय नसून  तो  सर्वांसाठी आहेत. ते गांभीर्याने विचार करण्यासारखा आहे.  त्यासाठी आम्ही पाठीशी आहोत.  शेवगावच्या तहसीलदार गुरव यांनी आपल्या मनोगतात  जे कोणी आरोपी आहेत ते पोलीस विभागा लवकरात लवकर यांना ताब्यात घेतील असे बोलुन  बलदवा  कुटुंबास भावपूर्ण श्रद्धांजली  अर्पण केलीं

 चौकट 
बलदावा परिवारा मध्ये जो हल्ला झाला यासाठी अनेक महिला भर उन्हात या मूक मोर्चामध्ये सहभागी होते. महीलांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या