श्रीरामपूर | प्रतिनिधी - श्रीरामपूर शरहातील गोंधवणी रोड परिसरात मागील भांडणाच्या कारणातून आपापसातील झालेल्या वादात काल पहाटे 4 वाजता दोघा जणांनी तन्वीर शाह या तरुणाची चॉपरने वार करून हत्या केली हत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने श्रीरामपूर शरहासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . या हत्येमुळे गोंधवणी परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.
काल पहाटे गोंधवणी रोड परिसरात तन्वीर शाह हा थांबलेला असताना रुपेश शिंदे (बाबजी),सुनिल देवकर या दोघांनी तन्वीर शाह याला अडवून शिवीगाळ करून चॉपरने आठ ते दहा वार करून त्याची हत्या केली.
घटनेनंतर दोघेही मारेकरी पसार झाले. पोलिसाना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले .सद्या गोंधवणी गावात वातावरण तणावाचे झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे
0 टिप्पण्या