BRS : महाराष्ट्रातील राजकीय प्रस्थापितांना भारत राष्ट्र समिती करणार चितपट?

 


निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखली रणनीती

के चंद्रशेखर राव, BRS president


राहुल कोळसे l राष्ट्र सह्याद्री 

अहमदनगर : राजकीय वर्तुळात सध्या तेलंगणच्या के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची (बीआरएस) चर्चा आहे. त्यांनी नांदेड, औरंगाबादमार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. त्यांचा हाच प्रवास संपुर्ण महाराष्ट्रात पोचला आहे. सर्व मतदारसंघांत त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांचाही वाढता प्रतिसाद प्रस्थापित राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढविण्याची शक्यता आहे.


भारत राष्ट्र समितीने शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक मतदारसंघात समन्वयक नेमला आहे. प्रत्येक गावात ११ कमिट्या बनविल्या जात आहेत. पक्षात सक्रिय सभासद करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते दौरे करीत आहेत. त्यांच्यासाठी एक गाडी, भोंगा देऊन तेलंगणातील लोककल्याणकारी योजनांचा प्रचार केला जात आहे. नावनोंदणीसाठी टॅबही दिला. या संदर्भात बीआरएस पक्षाच्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

______

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघ पिंजून काढण्याचा चंग 

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघ पिंजून काढण्याचा चंग भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) बांधला आहे. या सर्व ठिकाणी शेतकरी हितासाठी राबवलेल्या 'तेलंगणा पॅटर्न'चा प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे. यासह बीआरएस शेतकऱ्यांचे संघटनही करत आहे. 

-

प्रदेशाध्यक्ष बीआरएस महाराष्ट्र
________

 महाराष्ट्रात लवकरच 'बीआरएस'चा मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशाला लागलेला कलंक आहे. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांच्या ९९ टक्के आत्महत्या थांबल्या. महाराष्ट्रात विविध योजना राबवण्यासाठी बीआरएस सर्व मतदारसंघात काम करत आहे. महाराष्ट्रात लवकरच 'बीआरएस'चा मुख्यमंत्री असेल.

-

मुख्य समन्वयक महाराष्ट्र
_______ 

 सोशल मीडिया प्रभावी अंमलबजावणी

निवडणुकीपूर्वी तेलंगणात केसीआरने राबविलेल्या योजनांच्या प्रचाराबद्दल बीएसआरची आक्रमक योजना आहे. एक महिना त्यांचे हे अभियान राबविले जाणार आहे.तेलंगणातीललोककल्याणकारी योजनांचा प्रचार केला जात आहे. नावनोंदणीसाठी टॅबही दिला.तसेच सर्व योजनांची माहिती सोशल मीडियाच्या सर्व माध्यमातून सुरू आहे.

-

मुख्य समन्वयक सोशल मीडिया महाराष्ट्र
________

 नगर व नाशिक जिल्ह्यात जोरदार नोंदणी 

नांदेड येथे पक्षाची प्रशिक्षण शिबिर पाडल्यानंतर अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात पक्ष नोंदणी ला प्रचंड प्रतिसाद हा शेतकरी विद्यार्थी तसेच इतर घटकातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे शेतकऱ्यांना आता चांगला पर्याय मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा बी आर एस कडे कल वाढला आहे.

-

बीआरएस उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष 
-----------

बीआरएस महाराष्ट्र स्वबळावर

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेतकरी हिताचे धोरण राज्यात राबवत ते महाराष्ट्रातही अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राय यांचा बीआरएस मराठवाड्यापासून महाराष्ट्रात पाय पसरत आहे. भविष्यात राज्यात आगामी सर्व निवडणुका बीआरएस ताकदीने स्वबळावर लढवेल

_

बीआरएस राज्य समन्वयक 
_______

मराठवाड्यात जनतेचा चांगला प्रतिसाद

[नांदेड ,औरंगाबाद येथे भारत राष्ट्र समितीच्या सभा पार पडल्या आता पक्ष नोंदणी चालू आहे. या पक्ष नोंदणीला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे येत्या काळात मराठवाड्यातून भारत राष्ट्र समितीला चांगली यश मिळू शकते.

-

समन्वयक भारत राष्ट्र समिती 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या