सुमार दर्जाच्या सीसीटीव्हीमुळे अडथळे
शिर्डी : शिर्डी शहरात पानमळा परिसरात डोक्यात दगड टाकून खुन झालेल्या महिलेची ओळख पटवण्यासाठी सर्व शक्यता गृहित धरुन तपास केला जात आहे. जवळपास १५०च्या आसपास शिर्डी शहरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले. त्यातील एकाही सीसीटीव्ही मध्ये आरोपी स्पष्ट दिसत नाही. शिर्डी बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील सुमार दर्जाचे असल्यामुळे कुणाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
महिलेच्या मृतदेह शेजारी सापडलेल्या पाण्याच्या बाटलीच्या आधारे देखील तपासाचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात वरिल वर्णनाची महिला कुठे बेपत्ता असल्याची नोंद आहे का? याचीदेखील चौकशी केली जात आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सी आय डी विभागाकडे देखील माहिती पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.
या खुनाबद्दल कोणाला काही माहिती असेल तर ती देण्यासाठी पुढे यावे, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी केले आहे.
0 टिप्पण्या