बालाजी देडगावात धावली 20 वर्षानंतर लालपरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सुमारे 20 वर्षापासून बंद असलेली बससेवा आज पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी बसचे बालाजी देडगाव येथे ग्रामस्थांनच्या वतीने पूजन करण्यात आले यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे चिरंजीव विष्णू मुरकुटे व बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे यांच्या हस्ते चालक सुरेश फुंदे, वाहक कैलास आव्हाड यांचे श्री बालाजीची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे आकाश चेडे, पोलीस मित्र समितीचे अध्यक्ष शहादेव मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, विलास मुंगसे, अरुण वांढेकर, बाळासाहेब मुंगसे, निलेश कोकरे, हरिभाऊ मुंगसे, पोपट बनसोडे, रंगनाथ कोळपे, अर्जुन कोकरे, खंडेश्वर तांबे, उद्धव औटी, गोपाळ कुसळकर, शंकर बताडे, बंडा टकले, असलम पठाण, अमोल म्हस्के, श्रावण औटी, बंडू अकोलकर, आकाश हिवाळे, हरिभाऊ मुंगसे, किशोर मुंगसे, पोपट मुंगसे, मच्छिंद्र मुंगसे, विठ्ठल शिरसागर, दिलावर सय्यद, चांगदेव टकले, अरुण मुंगसे, अशोक तांबे, विजयकुमार वांढेकर, उत्तमराव तांबे, शांताराम नांगरे, महादेव मुंगसे, राजू पाठक आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या