भंडारदरा धरण ओव्हरफ्लो ! 5 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू


भंडारदरा प्रतिनिधी - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून घाटघर आणि रतनवाडी परिसरात कोसळणाऱ्या पावसाने भंडारदरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.भंडारदरा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.पावसामुळे भंडारदऱ्याचं निसर्ग सौदर्य खुललं आहे.

अनेक ठिकाणी छोटे मोठे धबधबे हे प्रवाहित झाले असून उंचावरून पडणारे धबधबे आता पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.

तर धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाच्या स्पिल वे गेटमधून 5 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.हा पाण्याचा विसर्ग निळवंडे धरणात जमा होणार आहे.निळवंडे धरणही 50 टक्के भरलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या पावसामुळे धरणं मात्र भरू लागली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या