500 रुपयांच्या बनावट नोटा बाजारात

नोटा तपासून व्यवहार करा



 वैजापूर :  

वैजापूर : शहरात अज्ञात भामट्याने ५०० रुपयांच्या पाच बनावट चलनी नोटा देऊन तीन विक्रेत्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बनावट देऊन व्यवहारात फसवणूक होत असल्याचे प्रकारामुळे छोटे व्यापारी वर्गात गडबडून आहे.

पाचशे रुपये मुल्यांची हुबेहूब दिसणारी चलनी नोट निरखून बघितल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात येते. जुने बसस्थानक परिसरात लहान विक्रेत्याकडे गर्दीच्या ओघ पाहून नकली नोटा बाळगणारे भामटा त्या ठिकाणी ५० ते ७० रुपये किंमतीचे वस्तू खरेदी केल्यानंतर विक्रेत्यांच्या हाती ५०० रुपयांची चलनी नोट देऊन उर्वरित रक्कम घेऊन गायब झाले. या परिसरातील तीन लहान व्यापा-याकडे पाचशे रुपयांच्या पाच नकली नोटा दैनंदिन व्यवहारात आढळून आल्या.दरम्यान इतर व्यापा-याकडून माल खरेदी दरम्यान सदरील पाचशेच्या चलनी नोटा खोटया असल्याचे समोर आल्यामुळे व्यापा-यांना मोठा धक्का बसला.

बेकरीचे पदार्थ विकणा-या एका विक्रेत्यांला दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन गंडवण्यात आले.आठवडाभरा पुर्वी सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या नावाखाली भामट्याने महिलांचे दागिने लंपास केल्याच्या प्रकारा नंतर 500 रुपये किंमतीच्या बनावट नोटा बाजारपेठेत व्यवहारात वापरुन व्यापा-यांची फसवणूक केल्याचा प्रकारामुळे व्यापा-यांची झोप उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या