ऑनलाईन गेमच्या माध्यमातून 58 कोटींचा गंडा , आरोपीच्या घरातून 18 कोटींची रोकड जप्त
नागपुरातील - नागपुरात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोप हा गोंदियातील आहे. अनंत जैन असं आरोपीचं नाव असून तो फरार झाला. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी अनंत जैनच्या गोंदियातील घरी छापा घातल्यानंतर कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली आहे. अनंत जैनच्या घरातून आतापर्यंत जवळपास 18 कोटी रुपयांची रोख रक्कम, 15 किलो सोनं आणि 20 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. आरोपी हा क्रिकेट सट्टेबाज आहे. नागपूरच्या इतिहासातील ऑनलाईन फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना आहे.
0 टिप्पण्या