ACCIDENT: २८ प्रवाशांसह वणी घाटात एसटी महामंडळाची बस दरीत कोसळली

एकाचा मृत्यू; १५ ते २० प्रवाशी जखमी 

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक रहिवाशी तातडीने दाखल झाले. 


नाशिक : वणी घाटात एसटी महामंडळाची बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बसमध्ये २८ प्रवाशी होते, त्यातील एकाच मृत्यू झाला असून जखमींना तावळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. 


राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. एकीककडे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला. तर दुसरीकडे आज दिनांक १२ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रवाशांसह बस दरीत कोसळली. 
अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोमधील असल्याची माहिती मिळाली आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. तर २८ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या बस अपघातामध्ये पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमी प्रवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या