महिला भूमापक उपअधीक्षक लाच घेताना जेरबंद
सिन्नर : तक्रारदराने खरेदी केलेल्या प्लॉटच्या रेकॉर्डवरील जुन्या मालकाचे नाव कमी करून दुसऱ्या नावाची नोंद करण्यापोटी ५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील महिला उपअधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
संबंधित तक्रारदाराने मनेगाव (ता. सिन्नर) येथे खरेदी केलेल्या प्लॉटचे सिटी सर्व्हे नंबर रेकॉर्डवर जुन्या मा
लकाचे नाव होते. त्यामध्ये बदल करून तक्रारदाराला स्वतःच्या पत्नीचे नाव लावायचे होते. सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक उपअधीक्षक प्रतिभा दत्तात्रय करंजे यांनी सदर कामासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
0 टिप्पण्या