आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुण्यात तृतीयपंथी आक्रमक

 आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना 'हे बघा हिजड्यांचे सरदार,' असे वक्तव्य केले होते. याविरोधात तृतीयपंथी आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन करत आहेत. आमदार नितेश राणे यांच्याविरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथी समाजाच्यावतीने रास्ता रोको करत आंदोलन करण्यात येत आहे.

पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडून नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत नाहीय. पण जोपर्यंत नितेश राणे यांच्यावर पुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन करु अशी आक्रमक भूमिका यावेळी तृतीयपंथीयांनी घेतली आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. रास्ता रोको करणाऱ्या तृतीयपंथीयांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे. यावेळी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या