दुहेरी खुनातील आरोपींना ठोकल्या बेड्या

दुहेरी खुनातील आरोपींना ठोकल्या बेड्या नगर : यवतमाळ जिल्ह्यातील दुहेरी खुनाचा गुन्ह्यातील फरार सहा आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. नयन अनिल केवटे (रा. हनुमंतबाबा मंदीरा जवळ, विटाळवार्ड, ता. पुसद, जिल्हा यवतमाळ) यांचे कुटूबिंयाना गावातील पवन वाळके व त्याचे इतर साथीदारांनी किरकोळ वादावरुन कोयता व चाकुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे चुलते राहुल हरीदास केवटे, चुलत भाऊ क्रिश विलास केवटे यांना जीवे ठार मारले. याप्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ येथे आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन गुन्ह्यातील आरोपी महिंद्रा कंपनीचे मालवाहु टेम्पो मधुन फरार झाले होते. पोनि दिनेश आहेर यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, शरद बुधवंत, पोना/ रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, फुरकान शेख, विशाल गवांदे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमले. पथकाने २० जुलै रोजी वांबोरी फाटा येथे जावुन सापळा लावला असता एक महिंद्रा कंपनीचा मालवाहु टेम्पो येताना दिसला. पथकाने टेम्पो थांबवून टेम्पोलीत व्यक्तींची चौकशी केली. पवन बाजीराव वाळके (वय २३), निलेश दिपक थोरात (वय २४), गोपाल शंकर कापसे (वय २६), गणेश संतोष तोरकड (वय २१), गणेश शंकर कापसे (वय २४), अवि अंकुश चव्हाण (वय २२, सर्व रा. विटाळवार्ड, ता. पुसद, जिल्हा यवतमाळ) असे असल्याचे सांगितले. संशयीताकडे विचारपुस करता त्यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांना महिंद्रा कंपनीचे मालवाहु टेम्पोसह ताब्यात घेवुन पुसद शहर पोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ यांचे ताब्यात देण्यात आले आहे.हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या