मुंबई - ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा असाच हा आरोप आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच याबाबतचे पुरावे लवकरच देणार असल्याचंही त्यांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.
ख्यमंत्री कार्यालयातून अनेक तुरुंगातील भयंकर गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. काही लोकांना जामीन देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबतचे लवकरच पुरावे देईल. 302च्या गुन्ह्याखाली आत असलेल्या गुन्हेगारांना निडवणुकीपूर्वी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी गुन्हेगारांशी डिलिंग सुरू आहे. काय करत आहेत गृहमंत्री? या गोष्टीचा देवेंद्र फडणवीस यांना राग आला पाहिजे. मी लोकप्रतिनिधी आहे. राजकारण नंतर. समजून घ्या आम्ही काय सांगतो ते. तुम्ही घटनात्मक पदावर आहात मिस्टर फडणवीस. आमचं काय वाकडं करणार आहात? जे करायचं ते करा. हिंमत असेल तर आमनेसामने लढा, असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं.
0 टिप्पण्या