Breaking News : नगरमध्ये बनावट पदव्या विकणारे रॅकेट उघड

 अशोक सोनवणेला अटक; दिल्ली कनेक्शन उघड

नगर : दहावी व बारावीची बनावट गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, तसेच विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदवी, शाळांचे बनावट दाखले तयार करून नगरमध्ये ५० ते ६० हजार रुपयांना विक्री केल्या प्रकरणी नगर शहरातील रुद्र एज्युकेशन सोसायटीच्या पॅरामेडिकल कॉलेजमधील अशोक नामदेव सोनवणे (३७, रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून काही गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, दाखले, मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याला न्यायालया समोर हरज केले असता  न्यायालयाने  त्याला २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 या प्रकरणी विशाल पारधे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली होता.  सोनवणे याने  दिलेल्या तक्राकरीत म्हटले होती. अशोक सोनवण याने बीएससी एमएलटीचे बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली आहे. पारधे याच्या अर्जदाची दखल घेत  तोफखाना पोलिसांनी या अर्जाची चौकशी करत पारधे यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर अशोक सोनवणे यास चौकशीसाठी बोलावले.

चौकशी सुरू असतानाच सोनवणे यास मोबाईलवर आलेल्या कॉलचा संशय आल्याने पोलिसांनी फोनची माहिती घेतली. कुरिअर कंपनीचा फोन असल्याचे समजताच पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या कार्यालयात जाऊन आलेले पार्सल ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेची इयत्ता दहावी व बारावीची प्रमाणपत्रे आढळून आली. ती बनावट असल्याचे समोर आले. आरोपी सोनवनेेला कोर्टाने २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या चौकशीत आरोपी सोनवणे याने बनावट गुणपत्रके, प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे दिल्ली येथील सचिन व चेतन शर्मा यांच्याकडून तयार करून घेतल्याचे समोर आले आहे. तसेच यापूर्वी आरोपीने शिवाजी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आदी विद्यापिठांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून ती ५० ते ६० हजार रुपयांना विक्री केल्याचेही समोर आले असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगीतले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या