कोंबडी हुसकावल्याने सुनेकडून सासूला बेदम मारहाणसुनेकडून सासूला बेदम मारहाण सासूने केला गुन्हा दाखल 

कोंबडी हुसकावली म्हणून मारहाण 

वृद्ध सासू नगरच्या जिल्हा रुग्णालयात 

साकूर प्रतिनिधी:


 घरात आलेल्या कोंबड्या हुसकावून लावल्याने सुनेने सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील हाळदेवस्ती साकुर येथे घडली. ही घटना ७ जून रोजी घडली. याबाबत १२ जुलै रोजी जिल्हा रुग्णालय नगर येथून सासूचा जबाब टपालाने पोलिस ठाण्यास प्राप्त झाल्याने सुनेविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुंदरबाई दत्तू भुतांबरे (वय ५५ वर्षे, रा. हाळदेवस्ती, साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या जबाबावरून शिल्पा दीपक भुतांबरे व शीतल (पूर्ण नाव माहीत नाही.) दोन्ही रा. हाळदेवस्ती साकुर, ता. संगमनेर यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुंदराबाई यांची सून शिल्पा हिच्या कोंबड्या सुंदराबाई यांच्या घरात आल्या. त्या घराबाहेर हुसकावून लावल्याने शिल्पा हिला राग आला. शिल्पा आणि शीतल यांनी सुंदराबाई यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांनी जबाब दिला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल जी. पी. लोंढे हे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या