एटीएम फोडणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चार आरोपींना केले जेरबंद


अहमदनगर ः एटीएम फोडणारी टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आवळ्या असून चार आरोपींना केले जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आहे. 

अजित अरुण ठोसर (वय २२, रा. मातकुळी) ता. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. पंम्पींग स्टेशन, साईनगर, ता. संगमनेर व जमीर जाफर पठाण (वय २१, रा. खांडगांव) ता. संगमनेर रविंद्र वाल्मिक चव्हाण (वय ३२) शुभम पोपटराव मंजुळे (वय २५) दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगांव यांच्या विरोध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रशांत अशोक साळवे (वय ३६) शाखा प्रबंधक बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा यांनी  फिर्याद दिली असून या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 

  बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा येथील एटीएम जवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांचेकडील विना नंबर कारमध्ये सिल्व्हर रंगाची मारुती सुझूकी कंपनीची स्विफ्ट कारमध्ये येवुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन मशिनमधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकरणी फिर्यादी यांचे तक्रारीवरून

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी दोन पालीस पथकांची नेमुण करण्यात होती. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बॅक ऑफ महाराष्ट्रा येथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन चोरी करणारे रेकॉर्ड वरील आरोपींचा राहुरी परिसरात शोध घेताना पथकास एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने जाताना दिसली. पथकाने लागलीच संशयीत भरधाव कारची माहिती पोनि. दिनेश आहेर यांना कळताच. पोनि. आहेर यांनी पथकास सदर कारचा पाठलाग करण्यास सांगितले व दुसरे पथकास नगर मनमाड रोडने जावुन कारचा शोध घेण्यास सांगीतले. पथक एमआयडीसी, विळद परिसरात संशयीत वाहनाचा शोध घेताना सदर वाहन बायपास रोडने जाताना दिसले. पथकाने खातगांव टाकळी गांवचे शिवारात स्विफ्ट कारला थांबविले असतांना त्यांना यावेळी  विचारपुस केली असतां त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यावेळी कारची झडती घेता कारमध्ये ऑक्सीजन सिलेंडर, भारतगॅस कंपनीची टाकी, पेंट स्प्रे, गॉगल, स्टील रॉड, निळे व लाल रंगाचा पाईप, रेग्युलेटर, नोझल, ऍ़डजस्टेबल पक्कड व ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळुन आले.

या प्रकरणी अजित अरुण ठोसर (वय २२, रा. मातकुळी) ता. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. पंम्पींग स्टेशन, साईनगर, ता. संगमनेर व जमीर जाफर पठाण (वय २१, रा. खांडगांव) ता. संगमनेर यांच्या विरोध्दात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर विविध गुन्हा दाखल  आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या