Breaking News: फसवणूक झालेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाचा बलात्कार!

  • राहुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखलराहुरी शहर प्रतिनिधी

जमिनीच्या प्रकरणात फसवणूक झालेली महिला राहुरी पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी आली. मात्र तिला न्याय देण्याऐवजी तिचे शारीरिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सजन्नकुमार नाऱ्हेडा  यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली प्रवरा येथील एका जमीन खरेदी प्रकरणात तिची फसवणूक झाली होती. त्याची फिर्याद देण्यासाठी ती पोलीस ठाण्यात गेली. तेथे तिची ओळख पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांच्याशी झाली. त्यांनी दिला 'गुन्हा दाखल करण्याच्या बदल्यात मला काय मिळेल'? अशी विचारणा केली. महिलेने त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतरही नाऱ्हेडा यांनी तिचा पाठपुरावा सुरू ठेवला. शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी तो तिच्याकडे करू लागला. त्यासाठी वेळोवेळी धमक्याही दिल्या. याची तक्रार पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांकडे केली. 

त्याने उपनिरीक्षक नाऱ्हेडा अधिकच चिडला. तुझ्या घरी येऊन तुझ्या मुलांसमोर मी काहीही कृत्य करू शकतो, अशी धमकी देत त्याने तिला आपल्या खोलीवर बोलावले. तेथे पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध नाऱ्हेडा याने बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार 17 जुलै 2023 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या