रायगडमधील इरसालवाडी मातीमोल; मृतांची नावं समोर, एकच आक्रोश


 इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास इर्शाळवाडीवर दरड कोसळली. ही घटना घडल्याची माहिती मिळताच तात्काळ प्रशासनाचे लोक तिथे पोहोचले. भौगोलिक परिस्थिती पाहिली तर डोंगरदरीत वसलेली ही वाडी आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.दरड कोसळण्याची घटना ही बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. यात 25 ते 26 कुटुंब बाधित झाल्याची माहिती आहे. यातील 21 जखमी असून 17 लोकांवर बेस कँप येथे उपचार तर 4 लोकांवक एमजीएम येथे उपचार सुरू आहेत. या घटनेत 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आगे. तर, इतर लोकांचा शोध घेतला जात आह़े.

शक्य तितक्या लवकर ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे हा प्राधान्याचा विषय आहे आणि तो प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न चाललेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या