दारुगोळा व स्फोटक पदार्थ बाळगणारा आरोपी जेरबंद

नगर - अवैधरित्या दारुगोळा व स्फोटक पदार्थ बाळगल्या प्रकरणी दिनकर शेळके यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलीस अधिक्षक. राकेश ओला यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, खारे कर्जुने, ता. अहमदनगर येथे दिनकर भोसले हा त्यांचे राहते घरी भारतीय सैन्य दलात वापरला जाणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थ अवैधरित्या बाळगतो अशी खात्रीशीर माहिती मिळताच . पथकाने खारे कर्जुने येथे जाऊन दिनकर शेळके यास भारतीय सैन्य दलात वापरला जाणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थाबाबत विचारपुस केली असता सुरुवातीस त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली , त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने राहते घरा समोरील पत्र्याचे शेडमध्ये आडगळीच्या सामाना खाली सदर दारुगोळा, स्फोटक पदार्थ व साधने ठेवलेली आहेत अशी माहिती दिल्याने त्यास 18 टॅन्क राऊंड, 5 मोटार राऊंड, 8 ऍ़म्युनेशन पिस्टल राऊंड, 16 पिस्टल राऊंड, 40 स्विचेस, लाल पिंवळी वायर बंडल व 25 किलो टीएनटी पावडर असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह ताब्यातघेतले असून त्याच्या विरुध्द एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या