महिला सरपंचांसह पती, सासरे, दीर व लहान मुलांना मारहाणअहमदनगर :


 पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभुळगाव येथील सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यासह त्यांचे पती, सासरे, दीर घरातील लहान मुलांना घरी येऊन लोखंडी दांडक्यासह कुऱ्हाडीने जबर मारहाण केल्याने सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब घोरपडे यांच्यासह इतर सात लोकांवर पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घडलेल्या घटनेबाबत सरपंच ज्योती घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजकीय वैमानस्यातून बाळासाहेब बाबासाहेब घोरपडे, ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे, सुशील बाबासाहेब घोरपडे, नितीन शिवनारायण घोरपडे, किशोर उत्तम घोरपडे, अंबादास उत्तम घोरपडे,गणेश विठ्ठल घोरपडे, उत्तम नामदेव घोरपडे (सर्व रा. वैजुबाभुळगाव, ता. पाथर्डी) यांनी आमच्या घरात घुसून माझ्यासह माझ्या पतीला व माझ्या लहान मुलांनादेखील जबर मारहाण केली आहे.

ही मारहाण ग्रामपंचायतच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करून, गावात दहशत निर्माण करण्याचे काम वरील आरोपींकडून झाले असल्याचे सरपंच घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या